पाताळेश्वर माध्यमिक विदयालयात भरला बाल वैज्ञानिकाचा मेळावा

0

बाल वैज्ञानिकांचा आविष्कार

सिन्नर : पाताळेश्वर माध्यमिक विदयालयात,पाडळी ता.सिन्नर येथे शनिवार दि.३०/११/२०२४ रोजी शाळा अंतर्गत विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन शालेय समितीचे चेअरमन रेवगडे चंद्रभान नामदेव,समर्थ सावली आश्रम ठाणगाव संस्थापक अध्यक्ष जयराम शिंदे, बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक  एस.बी.देशमुख आणि बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे कोषाध्यक्ष व विद्यालयाचे उपशिक्षक  टी.के.रेवगडे यांच्या हस्ते करण्यात आले. 

 

विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी संक्रीय सहभाग घेतला या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी स्वयंमचलित पूल अपघात नियंत्रण,शेतकऱ्याची बंदूक,पवन चक्की,सॅनिटायझरचा वापर,चान्द्रयान, मानवी हृद्य रचना,भूकंप रोधक यंत्र,आधुनिक शेती,ठिंबकसिचन,अल्प पाण्यावर शेती,शेतीसाठी शेततळे ,लोह चुबंकाचा वापर करून अपघात नियंत्रण सायकल पासून वीज निर्मिती,पाणी व्यवस्थापन,कचऱ्यापासून इंधन निर्मिती,चोरांपासून सुरक्षित घर,रस्त्यावरील अपघात सूचक यंत्र,महापूर सूचक यंत्र ,कचरा व्यवस्थापन कंपोस्ट खताचा वापर अशा प्रकारचे उपकरणे विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात मांडली होती.

 त्यात रोड सुरक्षा स्वयंमचलित रस्ता वाहतूक अपघात नियंत्रण यात विद्यार्थ्याने रस्ताची देखभाल  करणे. तसेच महापूर आल्यास धोका म्हणून लोंकाना सावधान करण्याचा इशारा यंत्रमार्फत कर्ला जातो अशी अनेक प्रकारच्या उपकरणामध्ये विद्यार्थ्यांनी आपले विचार संशोधनातून बाल वैज्ञानिकांनी मांडण्याचा प्रयत्न केलेचे दिसून आले.यातून विद्यार्थ्याचे वैज्ञानिक दृष्टीकोन वाढला व निरीक्षण करण्याची क्षमता ,चिकित्सक विचार रुजण्यास मदत झाली.शाळेतील १५० विद्यार्थांनी सहभाग घेतला. ५७ प्रतिकृती  मांडण्यात आल्या. 

 

या प्रदर्शनात दोन गटात विभाजन करण्यात आले व त्यातून क्रमांक काढण्यात आले.इ.५ वी ते ७ वी च्या गटात प्रथम क्रमाक –पॉवर प्लॉट गॅस मयूर लहू पालवे,आदित्य दिलीप पाटोळे,व्दितीय क्रमाक – आँटोमॅटीक पथदीप –आयुष संपत शिंदे,शुभम नारायण जाधव,सार्थक गणेश शिंदे,तृतीय क्रमाक –मानव विरहीत हेलिकॉप्टर -शौर्य महादेव शेलार,उत्तेजनार्थ-मानवी सुरक्षा पूर नियंत्रण –साहिल जयराम* *रेवगडे,रूम प्रेसर–स्वराज भगीरथ रेवगडे,वंश प्रकाश निकम तसेच इ.८ वी ते १० वी च्या गटात –प्रथम क्रमाक –रोड सुरक्षा – श्याम प्रल्हाद रेवगडे,नितांषु गणेश शिंदे,दर्शन रामकृष्ण वारुंगसे व्दितीय क्रमाक भूकंप रोधक यंत्र –कु.पूनम संजय बोगीर, वैष्णवी अण्णासाहेब जाधव ,तनुजा गणेश रेवगडे तृतीय क्रमाक –मानवी हृद्य रचना–रेवगडे आदित्य लक्ष्मण ,दर्शन राधाकिसन शिंदे,उत्तेजनार्थ –सोलर कुकर -साई शांताराम रेवगडे,ओम नवनाथ रेवगडे याप्रमाणे विद्यार्थ्याचे क्रमाक काढण्यात आले. 

 तसेच विद्यालयातील शिक्षक बी.आर.चव्हाण, आर.व्ही.निकम,एस.एम.कोटकर ,आर.टी.गिरी, एम. एम.शेख, सविता देशमुख,सी.बी.शिंदे, के.डी.गांगुर्डे, एस.डी.पाटोळे,आर.एस.ढोली,ए.बी.थोरे यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here