सिन्नर : पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी वेग – वेगळ्या मनोऱ्यातुन केले नुतन वर्षांचे २०२३ चे स्वागत केले . यावेळी बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी एस बी देशमुख यांनी विदयार्थ्यांना नुतन वर्षाच्या शुभेच्छा देतांना काही संकल्प दिले . रोज दैनंदिनी लिहावी, मोबाईल व टी .वी. चा आवश्यक तेवढाच वापर करावा, आई वडिल व मोठ्या व्यक्तिंचा आदर करावा, नियमितपणे शाळेत यावे, मी माझे व माझ्या कुटुंबाची सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता ठेवीण, पर्यावरणाचे रक्षण करेन यावेळी विदयालयातील बालविज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे कोषाध्यक्ष टी के रेवगडे यांनी विदयार्थ्यांकडून वेगवेगळ्या प्रकारचे मनोरे करुन घेतले . यावेळी चव्हाण बी आर, निकम आर व्ही, कोटकर एस एम, गिरी आर टी, शिगोंटे एम सी ,श्रीम . शेख एम एम, सविता देशमुख, श्रीम . शिंदे सी बी ,गांगुर्डे के डी ,पाटोळे एस डी, ढोली आर एस ,थोरे ए बी उपस्थित होते .