नाशिक : मुख्याध्यापक संघाचे काम आर्दशवत आहे . त्याचप्रमणे शिक्षक समाजाला दिशा देण्याचे काम करतात. त्यांचे कार्य सर्वांसाठी अद्वितीय तसेच प्रेरणादायी आहे. त्यांचे अनेक प्रश्न,मागण्या प्रलंबित आहेत. त्यांचे प्रश्न सोडविणे माझी नैतिक जबाबदारी आहे असे प्रतिपादन आमदार सत्यजित तांबे यांनी केले. सिन्नर येथील सह्याद्री युवामंच,तालुका मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमात आमदार तांबे यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली.व्यासपीठावर सह्याद्री युवामंचाचे अध्यक्ष युवानेते उदय सांगळे,मा.जिल्हा परिषद अध्यक्षा शितलताई सांगळे, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस.बी.देशमुख,आर.बी.एरंडे, डी.एम. काळे आदी उपस्थित होते. यावेळी तांबे यांच्याहस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना शाल, श्रीफळ,सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी सह्याद्री युवा मंचाचे अध्यक्ष उदय सांगळे यांच्या सामाजिक उपक्रमाचे तांबे यांनी कौतुक केले. शिक्षक करत असलेले ज्ञानदान याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात पुढाकार घेतला त्याबद्दल उदय सांगळे यांची सर्वांनी प्रशंसा केली. यावेळी मनोगत व्यक्त करताना, राजकारणात अनेक सुसंस्कृत राजकारणी असल्यामुळे देशाचे भविष्य उज्वल आहे.
आमदार बाळासाहेब थोरात, मा.आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी राजकारणात आदर्श निर्माण केला असून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे वाटचाल करीत असून त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे गौरवोद्गार युवानेते उदय सांगळे यांनी काढले. यावेळी प्रास्ताविकात मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस.बी देशमुख यांनी आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा अधिक नेत्रदीपक व भव्य दिव्य करण्यासाठी युवानेते ,सह्याद्री युवामंचाचे अध्यक्ष उदयभाऊ सांगळे यांना विनंती केली.ती त्यांनी लगेच मान्य करून कार्यक्रमाचे प्रायोजकत्व स्वीकारले त्याबद्दल त्यांचा सत्कार करून धन्यवाद दिले.यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात काही शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. सौ . एस एस देशमुख व सौ . व्ही एस सानप यांनी सूत्रसंचालन केले.
या शिक्षकांचा झाला गौरव..
एस.बी.देशमुख,रामनाथ लोंढे,एस. टी.पांगारकर,उदय देवणपल्ली, सौ सविता देशमुख ,वृषाली लोंढे,सोमनाथ गिरी,पी.आर. कर्पे,बाळासाहेब देशमुख, टी.के. रेवगडे,शिवाजी गाडेकर,सुभाष आव्हाड,एस.एस. राठोड,सी.पी घरटे,एस.जी.पगार, बी.के.आव्हाड,स्मिता पाटोळे,आर.व्ही.कांबळे, रुक्सार इम्तियाज सैय्यद,आर.एस.गडाख,के.बी. बोडके, अंबादास जाधव,भगवान भडांगे,अनिता गंगावणे,प्रभाकर बोडके, वृषाली वाजे, द्वारकाबाई शेळके, एल.डी.बेनके,सविता शुक्ल, रमेश पठाडे ,प्रवीण,संजय,एकनाथ भाबड, आहेर,विजय अलगट पानपाटील,एस.एस.झनकर,