सिन्नर/नाशिक : महाराष्ट्र राज्य शिक्षण आयुक्तांनी शाळांना वेतन अदा करण्यासाठी विद्यार्थी आधार प्रमाणीत करण्याच्या आदेशास मुदतवाढ मिळावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ संयुक्त महामंडळाच्या वतीने शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्या सोबत झालेल्या बैठकी दरम्यान करण्यात आली .
याबाबत अधिक माहिती देताना सचिव एस. बी. देशमुख यांनी सांगितले की महाराष्ट्र राज्य शिक्षण आयुक्तांनी शाळांना वेतन अदा करण्यासाठी विद्यार्थी आधार प्रमाणीत करण्याच्या बाबत शासन निर्णय ६ फेब्रुवारी २०२३ रोजी काढलेला शासन निर्णय यात सुधारणा करून त्याची मुदत ३१ मार्च २०२३ पर्यंत आहे. यात बऱ्याचशा तांत्रिक अडचणी असल्या कारणाने त्याला मुदतवाढ मिळावी म्हणून महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे अध्यक्ष के. एस. ढोमसे उपाध्यक्ष नंदकुमार बारावकर सचिव एस. बी. देशमुख पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष एच. आर. जाधव यांनी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्याशी चर्चा करून निवेदन दिले. १)नुकत्याच इ. १० वी व इ. १२ वी च्या बोर्ड परीक्षा झाल्याने सदर विद्यार्थी आधारासाठी उपलब्ध होण्यास स्थानिक पातळीवर अडचणी येतात २)आधार प्रमाणित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विद्युत पुरवठा खंडित होतो. तसेच संगणकीय प्रणालीमध्ये अनियमितता निर्माण होते ३) ज्या विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणित करायचे त्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नुसार लिंग, जन्म दिनांक व नाव या चुकांमुळे अप्रमाणित (Invalid ) होत आहे. ४) परराज्यातून प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणित होण्यास अडचणी येतात ५ ) विद्यार्थ्यांची सरल पोर्टलवरील माहिती व प्रत्यक्ष आधार कार्डवरील माहिती सारखी असून देखील संगणकीय प्रणालीमध्ये (Invalid ) अप्रमाणित होत आहे. ६ )विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड वरील दुरुस्तीसाठी शालेय नोंदी ग्राह्य धरण्यात याव्यात यामुळे ३१ I o३ ।२०२३ पूर्वी आधार अनिवार्य केल्याने उपलब्ध वेळेत अटींची पूर्तता करणे अवघड असल्याच्या तक्रारी मुख्याध्यापक संघाकडे आलेल्या आहेत. यामुळे या कामास मुदत वाढ मिळावी यावर शिक्षण आयुक्त यांनी कठोर भूमिका घेत हे काम आपल्याला वेळेत पूर्ण करावे लागेल व ज्या तांत्रिक अडचणी येतील त्या आम्ही सोडविण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले. तुमच्या कडून सहका र्याची अपेक्षा आहे.तसेच शिक्षकांची फरक बीले, मेडिकल बिले, रजा रोखीकरण यांनाही तातडीने मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावा. बऱ्याच ठिकाणी संस्थावादामुळे व मुख्याध्यापक संस्थाचालक यांच्या वादामुळे प्रमोशन डावलले जातात याबाबत संस्था चालकांकडून सेवाजेष्ठता यादी अपडेट करून घ्यावी. शालार्थ आयडीचे अधिकार ज्या अधिकाऱ्याने मान्यता दिली त्यांनाच शालार्थ आयडीचे अधिकार दिल्यामुळे सूरज मांढरे साहेब यांचे सचिव एस. बी. देशमुख यांनी आभार मानले. यावेळी अर्जुन सावंत सांगली, निळकंठ तलबार , आर. बी. सावंत, सूर्यकांत गस्ते सांगली, आर. एस. जाधव पुणे उपस्थित होते.