संजीवनी एमबीएच्या सात विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड

0

मागील वर्षीच्या सर्व गरजु एमबीए धारकांना नोकऱ्या, याही वर्षी त्याच दिशेने वाटचाल सुरू
कोपरगांव प्रतिनिधी :संजीवनी एमबीए विभाग आपल्या विद्यार्थ्यांना एमबीएच्या वेगवेगळ्या विषयांतील पदव्या देतो, तर याच विभागाचा ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभाग वेगवेगळ्या कंपन्यांच्या मुलाखतीत आपले विद्यार्थी उत्तिर्णच झाले पाहीजे, यासाठी वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवितो. दोनही विभागांच्या उत्तम समन्वयातुन विद्यार्थी जॉब रेडी बनताहेत. अलिकडेच श्रीराम फायनान्स कंपनीने घेतलेल्या मुलाखंतींमध्ये संजीवनी एमबीएच्या  सात विद्यार्थ्यांची आकर्षक  पगारावर निवड केली आहे.

मागील वर्षी ज्या विद्यार्थ्यांना त्यांचे एमबीए शिक्षण पुर्ण झाल्यावर नोकऱ्या  पाहीजे होत्या,अशा सर्व विद्यार्थ्यांना संस्थेच्या प्रयत्नाने नोकऱ्या  देण्यात आल्या. याही वर्षी त्याच दिशेने वाटचाल सुरू असल्याची माहिती संजीवनी एमबीए विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
          श्रीराम फायनान्स या विविध क्षेत्रात आर्थिक संबधित कार्य करणाऱ्या  कंपनीने हर्षद राजु कचरे,अविनाश विलास कुसळकर, हर्षद आत्माराम साबळे,साई रविंद्र शिंदे ,ओम सतिश तारगे, सफल राजु थोरात व साई रविंद्र पाटील यांची निवड केली आहे.
       

संजीवनी एमबीएला ऑटोनॉमस संस्थेचा दर्जा असल्यामुळे अभ्यासक्रम रचनेचे स्वातंत्र्य आहे. एमबीए विभागाने विविध उद्योगांच्या संक्रमणतेनुसार तज्ञांच्या सहकार्याने तसेच आपल्याच माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या सल्यांनुसार अभ्यासक्रमाची रचना केलेली आहे. यामुळे विद्यार्थी सहज कंपन्यांच्या कसोटीत उतरत आहे.
          संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार करून अभिनंदन केले व त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी संजीवनी विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर डॉ. ए.जी.ठाकुर व इतर प्राद्यापक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here