‘एक मुल एक झाड’ पाताळेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांनी केले वृक्षारोपण

0

सिन्नर : शिक्षण सप्ताह अंतर्गत पाताळेश्वर माध्यमिक विद्यालय, पाडळी या विद्यालयात विविध झाडांची रोपे आणून विद्यार्थी व शिक्षकांनी वृक्षारोपण केले. एक मुल एक झाड ही संकल्पना राबवुन झाड लावुन त्याची जोपासना करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला .यावेळी बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.बी.देशमुख यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व सांगून विद्यालयाच्या निसर्गात माजी विद्यार्थ्यांनी झाडे लावुन शाळेचा परिसर सजवला आहे .

आपणही प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे जतन करावे. तसेच कुठल्याही कार्यक्रमात इतर वस्तुंचा मान पान न देता एक रोपटे भेट म्हणून द्यावे असे सांगितले. यावेळी पूनम बोगीर प्रतिक्षा रेवगडे, वैष्णवी रेवगडे, जान्हवी रेवगडे, नितांशु शिंदे आदी विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. यावेळी बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे कोषाध्यक्ष व विद्यालयाचे उपशिक्षक टी. के. रेवगडे, बी. आर. चव्हाण, आर. व्ही. निकम , एस. एम. कोटकर, आर. टी. गिरी, एम. एम. शेख, सविता देशमुख, सी. बी. शिंदे, के. डी. गांगुर्डे, एस. डी. पाटोळे, आर. एस. ढोली, ए. बी. थोरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here