येवला प्रतिनिधी
तालुक्यातील अंदरसुल गावातील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे विद्यालय व जुनिअर कॉलेज मध्ये नायलॉन मांजा विरोधी मोहीम सुरू करण्यात आली. पतंग उडवताना नायलॉन म्हणजे वापरणार नाही व वापरू देणार नाही अशी शपथ शिक्षक व विद्यार्थ्यांनी घेतली.
या नायलॉन माझ्यामुळे पर्यावरणातील पशु, पक्षी, प्राणी तसेच लहान मुले व माणसे यांना इजा होऊन मोठ्या प्रमाणात दुर्घटना होण्याची शक्यता असते. म्हणून नायलॉन मांजा वरती बंदी टाकण्याचा निर्णय विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक यांनी घेतला. गाव परिसरात विद्यार्थ्यांनी नायलॉन मांजाच्या विरोधात मोहीम उघडून जनजागृती केली.
सदर मोहिमेसाठी विद्यार्थी व पालकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. गावात नायलॉन मांजा उपलब्ध होणार नाही यासाठी विद्यार्थी , शिक्षक व पालकांनी मोहीम हाती घेतली आहे.
सदर उपक्रमाचे अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री अरुण भांडगे ,सरचिटणीस श्री अमोल सोनवणे, उपाध्यक्ष सुदाम सोनवणे ,खजिनदार मकरंद सोनवणे ,संचालक राजेंद्र गायकवाड, उज्वल जाधव, राजेंद्र सोनवणे ,डॉक्टर बी के जाधव, आकाश सोनवणे ,जनार्दन जानराव ,जीवन गाडे ,लक्ष्मण सोनवणे , यांनी कौतुक केले.
या उपक्रमाप्रसंगी जुनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री सचिन सोनवणे ,मुख्याध्यापिका सौ जयश्री परदेशी, सुनील सपकाळ, महेश मेहेत्रे ,सागर गाडेकर ,संतोष जाधव, दिपाली सोनवणे,सुषमा सोनवणे, सुवर्णा मस्के,आरती जगधने,कांचन गायकवाड ,आरती भागवत, रेणुका भागवत, पूजा वडाळकर, मयुरी टेके,निर्मला शिकारे आदी उपस्थित होते.