हडपसर प्रतिनिधी ;
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०२३ साली घेण्यात आलेल्या समाज कल्याण अधिकारी परीक्षेत रोहित अनिल वाघ राज्यात प्रथम आला. त्याने मिळवलेल्या यशाबद्दल महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. एस.टी. साळुंखे, प्राचार्य डॉ. एम. व्ही. बोबडे (यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, पाचवड, सातारा), प्राचार्य डॉ. एल. डी. कदम (डी. पी. भोसले कॉलेज, कोरेगाव, सातारा) डॉ. ए. एन. दडस, डॉ. पी. जे. उंडे यांनी त्याचे अभिनंदन करीत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्याने मिळविलेल्या या अभूतपूर्व यशामध्ये महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.किशोर काकडे, उपप्राचार्य डॉ.संजय जगताप, उपप्राचार्य प्रा. संजय जडे, प्रा.अजित भोसले, अनिता शिंदे, महाविद्यालयातील प्राध्यापक व प्रशासकीय सेवक यांचे मोलाचे योगदान आहे.