हडपसर प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम.जोशी कॉलेजमधील मायक्रो बायोलॉजी विभागातील ऋतुजा राजेंद्र हवालदार (CGPA – 7.36) आणि साक्षी वसंत कुल (CGPA – 7.76) या विद्यार्थिनींनी बीएससी. मायक्रोबायोलॉजी मधून शिक्षण पूर्ण केले. पुढील एम.एस.सी. फॉरेन्सिक सायन्सच्या शिक्षणासाठी त्यांची निवड एंग्लिया रस्किन विद्यापीठ, केंब्रिज (युनायटेड किंगडम) या ठिकाणी झाली आहे.
त्याबद्दल महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. एस.टी. साळुंखे यांनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या यशामध्ये मायक्रोबायोलॉजी विभागाच्या विभाग प्रमुख डॅा. हेमलता कारकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच डॅा.सोपान आयनर यांची मदत झाली.