हडपसर : रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी कॉलेजमधील सूक्ष्मजीव विभागातील एम्.एस्सी व्दितीय वर्गातील राधिका बडदे आणि प्राची बोंगाळे या विद्यार्थिनींची आविष्कार स्पर्धेमध्ये विद्यापीठ पातळीवर निवड झाली आहे. या प्रकल्पामधे, मोबाईल ,कॉम्पुटर यांचे स्क्रीन्स जीवाणुविरहित करण्यासाठी लक्ष्मणफळ झाडाच्या पानांपासून तयार करण्यात आलेल्या नॅनोपार्टिकल्स चा वापर करण्यात आला आहे.
त्यांच्या या यशासाठी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. एस.टी. साळुंखे यांनी अभिनंदन करीत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या यशामध्ये उपप्राचार्य डॉ.किशोर काकडे, उपप्राचार्य प्रा . संजय जडे, उपप्राचार्य डॉ.संजय जगताप, सूक्ष्मजीव विभागाच्या विभागप्रमुख डॉ.कारकर एच. एस., मार्गदर्शक डॉ.प्रांजली बडिगेर तसेच रिसर्च सह-समन्वयक डॉ.रंजना जाधव, डॉ.सोपान आयनर, प्रा.प्रियंका भालेराव, प्रा.प्रदिप जाधव, प्रा.रुपाली मुरादे यांचेही योगदान आहे.