एस. एम. जोशी कॉलेजमध्ये मुलींसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

0

हडपसर २४ मे २०२४
प्रतिनिधी

रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी महाविद्यालयात मुलींसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन दोन आठवड्यांसाठी करण्यात आले आह़े. या शिबिरासाठी रयत शिक्षण संस्थेतील पासष्ट विद्यार्थीनी सह‌भागी झाल्या आहेत. कार्यक्रमाच्या उद्‌घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागीय चेअरमन आमदार चेतन (दादा) तुपे उपस्थित होते. तसेच उद्‌घाटक म्हणून अपर जिल्हाधिकारी बार्टी मधील स्नेहल भोसले उपस्थित होत्या. उद्‌घाटन प्रसंगी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य दिलीप (आबा) तुपे, अमर तुपे यांनी शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या.
शिबीरार्थी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना विकास देशमुख म्हणाले की, जीवनात तसेच स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी जि‌द्द व चिकाटी आवश्यक आहे. प्रत्येकाने जीवनात उच्च ध्येय बाळगले पाहिजे. तसेच ते ध्येय पुर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशिल राहणे आवश्यक आह़े.
शिबीराच्या उद्‌घाटक स्नेहल भोसले म्हणाल्या की, जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी ज्ञानाबरोबरच भावनांचे नियंत्रण करता येणे गरजेचे आहे. जीवनात अयशस्वी झाल्यावर यशाचे महत्त्व समजते. एकदा यशस्वी झाल्यानंतर खरा संघर्ष सुरू होतो. कारण काम करताना रोज नवी आव्हाणे व समस्या येतात त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी वेगाने वाचन करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर वाचलेले समजणे गरजेचे आहे. वाचलेल्या गोष्टींचे उपयोजन करता यायला हवे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किशोर काकडे म्हणाले की या शिबीराचा ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना निश्चित फायदा होईल ग्रामीण तरुणी स्पर्धा परीक्षांमध्ये नक्कीच यश मिळवतील. कारण ग्रामीण भागात विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. तो गुण मुलींना स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी मदत करेल.
उद्घाटन शिबिराचे सूत्रसंचालन डॉ. ज्योती किरवे यांनी केले. तर पाहुण्यांचा परिचय प्रा.अजित भोसले यांनी करून दिला. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.संजय जगताप, प्रा.संजय जडे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व सेवक यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here