पुणे /हडपसर प्रतिनिधी :
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय “युवक – युवती उन्नयनीकरण कार्यशाळेचा” उद्घाटन समारंभ पार पडला. कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मणिकर्णिका समूहाचे संस्थापक मनीषा प्रसाद राऊत उपस्थित होत्या. त्यांनी “महिला सबलीकरण” विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आजच्या प्रत्येक तरुणीने सार्वजनिक जीवणात वावरत असताना सजग राहायला पाहिजे. असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश साळुंखे उपस्थित होते. आजच्या तरुणांनी नवीन विज्ञान-तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा सामाजिक कार्यासाठी उपयोग केला पाहिजे. आजच्या तरुणांनी झोकून देऊन सामाजिक कार्य केले पाहिजे. असे मत प्राचार्य डॉ.साळुंखे यांनी व्यक्त केले. या कार्यशाळेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सदानंद भोसले यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, ट्रेनी नंदिनी मंडराई यांनी विद्यार्थ्यांना “सायबर क्राईम” यासंदर्भात मार्गदर्शन केले. सायबर क्राईम म्हणजे काय. ते कसे होतात. सायबर क्राईम थांबवण्यासाठी काय केले पाहिजे. यासंदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण असे मार्गदर्शन नंदिनी मंडराई यांनी केले. तालुका विधी सेवा समिती, पनवेल जिल्हा न्यायालयातील पीएलव्ही. शैलेश कोंडसकर यांनी “स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता आणि तरुणाई” या विषयावर बोलताना “सर्व धर्म समभावाचे महत्त्व” विद्यार्थ्यांना सांगितले. एस. एम. जोशी महाविद्यालयातील मराठी विभागातील डॉ.संदीप वाकडे यांनी “वाचन संस्कृती” या विषयावर मनोगत व्यक्त करताना २१ व्या शतकाची वाट तुडवत असताना वाचन संस्कृती जोपासणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रो.डॉ. दिनकर मुरकुटे यांनी तर पाहुण्यांची ओळख डॉ.निशा गोसावी यांनी करून दिली. कार्यक्रमाचे आभार प्रा.ऋषिकेश खोडदे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.अर्चना पाटील व प्रा.नयना शिंदे यांनी केले. कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रो.डॉ.किशोर काकडे, उपप्राचार्य प्रा.संजय जडे, डॉ.हेमलता कारकर, प्रा.किसन पठाडे, प्रा.संजय अहिवळे, महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.