पुणे /हडपसर प्रतिनिधी :
एस. एम. जोशी महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर सायन्स आणि अँप्लिकेशन विभागातर्फे एसएम टेक्नो वेंझा 2K25 या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत अनेक महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. आणि आपली कौशल्ये सादर केली. कार्यक्रमाचे उद्घाटन सुरेश उमाप (प्रादेशिक संचालक, महाराष्ट्र सेंटर ऑफ एन्ट्रेप्रेनियरशिप) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांनी अध्यक्षपद भूषवले.
दोन दिवस चाललेल्या स्पर्धेमध्ये पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा, रंगोली स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, मॉडेल व प्रकल्प स्पर्धा, खाद्य महोत्सव, मेमरी गेम्स, ट्रेझर हंट अशा विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये मोठ्या हौशेने सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्यांना प्रशस्तीपत्रके आणि पारितोषिके प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन प्रा. संगीता यादव, प्रा. सोनाली शिवरकर, प्रा. सुवांजली भानगिरे आणि त्यांच्या टीमने केले. विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम तंत्रज्ञान, कला आणि सर्जनशीलतेच्या क्षेत्रात अनुभव मिळवण्याची उत्तम संधी ठरला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक केले.