एस बी देशमुख आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानीत

0

सिन्नर : नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संचाचे सचिव तथा पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस बी देशमुख यांना गुरू पौर्णिमेनिमित्ताने सिध्दीविनायक मानव कल्याण मिशनच्या वतीने आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.  

 सिध्दीविनायक मानव कल्याण मिशनतर्फे गुरुपौर्णिमा लक्ष्मी लॉन्स नाशिक येथे उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळी डॉ तुळशीराम गुट्टे महाराज यांच्या अमृत वाणीने प्रवचन केले .

वृक्ष देऊन अनेक मान्यवरांचा सत्कार केला व आदर्श मुख्याध्यापक हा विशेष सत्कार एस बी देशमुख सचिव नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ यांचा सपत्नी ट्रॉफी, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान व गौरव करण्यात आला . तसेच  गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला . गणेश वंदना भरतनाट्य नृत्य प्रदर्शन दाखवण्यात आले .

या कार्यक्रमासाठी  पंढरीनाथ थोरे, हेमंत आप्पा धात्रक,  बुधाजी पानसरे,  दामोधर आण्णा मानकर, शरद बोडके, सुदाम बोडके, के के सानप, भागिनाथ घोटेकर , डॉ अनिल माळी प्रदीप सांगळे उपस्थित होते . यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले होते .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्याम पिंपरकर, संजीव अहिरे, बाळकृष्ण नागरे, दिलीप अहिरे, धनंजय बोडके, नंदू सानप, बाळासाहेब घुगे, रंगनाथ दरगुडे, रणजित आंधळे,विनायक सांगळे, विजय सोनवणे,  मंदाताई फड, चंद्रकला साबळे इ . नी विशेष परिश्रम घेतले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here