एस. बी. देशमुख जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित

0

सिन्नर : सहकार महर्षी त्र्यंबकराव घुगे (गुरुजी ) भाग्यश्री पतसंस्था निफाड यांच्याकडुन एस . बी . देशमुख यांना जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने खासदार भास्करराव भगरे यांच्या हस्ते सन्मानित केले . नुकताच निफाड येथे भाग्यश्री पतसंस्था यांच्या १९ व्या वर्धापन दिना निमित्त निफाड भुषण पुरस्काराने जेष्ट नेते श्रीराम शेटे व आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने एस बी देशमुख यांना  खासदार भास्कर भगरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले .

उपक्रमशील मुख्याध्यापक म्हणुन जिल्हा व राज्य स्तरावर उत्कृष्ट काम असल्याने त्यांना हा पुरस्कार देण्यात आला . या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार दिलीपकाका बनकर तर प्रमुख वक्ते ह .भ.प . रामकृष्ण महाराज लहवितकर ह .भ.प . संजय महाराज धोंडगे हे होते. यावेळी मा .आ .डॉ सुधीर तांबे, मविप्रचे सभापती सुनिल ढीकले ,माणिकराव बोरस्ते, हेमंत आप्पा धात्रक, बाळासाहेब शिरसागर, रमेश आप्पा घुगे, दिगंबर गिते , अनिल कुंदे , तानाजी जायभावे , गुरुनाथ कांदे , केदा नाना आहेर ,डी बी ढोमसे, योगेश मुरकुटे उपस्थित होते . कोणताही प्रस्ताव न मागवता कामाची प्रत्यक्ष पाहणी करून ह्या पुरस्काराची निवड केली असल्याचे डॉ सुधीर तांबे म्हणाले .खासदार भास्कर भगरे म्हणाले की हा आदर्श पुरस्कार म्हणजे देशाचा मान सन्मान आहे माझ्या मनातला हा पुरस्कार दिला याचा सार्थ अभिमान आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here