केळवणे को ए. सो. हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात संपन्न.

0

उरण दि १७(विठ्ठल ममताबादे ) : केळवणे येथे रविवार १६ मार्च २०२५ रोजी १९८२ ते २०२४ पर्यंतच्या माजी विद्यार्थी संघटनेचा मेळावा मोठया उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात प्रत्येक विद्यार्थी आपले राजकीय पक्ष बाजूला ठेऊन यामध्ये सामील झाले. या मेळावा कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे चेअरमन वि.ना.कोळी होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून  शाळेच्या १९८५ बॅचचे मुख्यद्यापक मोकल सर,म्हात्रे सर, व ग्रामपंचायत सरपंच  गुरुराज ठाकूर,ग्रामपंचायत सदस्य  कुमार पाटील,शाळा समिती डॉ. देविदास शिवकर, आशिष घरत, तसेच १२० माजी विद्यार्थी उपस्थित होते

को. ए. सो. केळवणे हायस्कूलची जुनी इमारत मोडकळीस आली असून तिथे नवीन इमारत बांधण्याचा संकल्प एस एस सी च्या  ४२ बॅचेसच्या या माजी विद्यार्थ्यांनी केला असून काही  विद्यार्थ्यांनी सढल हाताने या इमारतीसाठी  देणगी स्वरूपात तर काहींनी वस्तू स्वरूपात देण्यासाठी पुढे आले आहेत. त्यामुळे गावाला एक चांगली शाळा मिळेलच परंतु उद्याच्या नवीन पिढीला त्यांच्या  उज्वल भविष्यासाठी लवकरच जुनियर कॉलेज मिळेल अशी ग्वाही शाळा समितीचे सदस्य देविदास शिवकर यांनी दिली. सर्वांच्या सहकार्याने हा मेळावा मोठया उत्साहात साजरा झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here