उरण दि 19(विठ्ठल ममताबादे ) शिक्षण क्षेत्रातील प्रसिद्ध अशी नामवंत संस्था म्हणून सुपरिचित असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि .बा. पाटील ज्युनिअर कॉलेज दहागाव विभाग जासई. तालुका उरण जिल्हा रायगड या शैक्षणिक संकुलात रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभाग आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धा बुधवार दिनांक 18 /1/ 2023 रोजी पार पडल्या. या प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष भारतीय मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री व कामगार नेते सुरेश पाटील या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगत विद्यार्थ्यांना उदबोधन केले की विद्यार्थ्यांनी या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी अशा प्रकारच्या शैक्षणिक उपक्रमामध्ये सहभाग घेतला पाहिजे. आणि आपली गुणवत्ता वाढविली पाहिजे.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे चेअरमन अरुणशेठ जगे,पंचायत समितीचे माजी सभापती नरेशशेठ घरत हे उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभागीय कार्यालयातील लेखनिक गुजर सर,गावंड सर उपस्थित होते. तसेच या प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागातील सर्व शाळेतील विद्यार्थी ग्रुप सहभागी झाले होते .या कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक व रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर अरुण घाग , उपमुख्याध्यापिका पाटील एस .एस, पर्यवेक्षिका म्हात्रे एस. सी,रयत सेवक संघाचे महाराष्ट्र समन्वयक शेख सर यांनी यशस्वीपणे केले.तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अतुल पाटील यांनी केले .विद्यालयातील सर्व सेवक व विद्यार्थी यांनी कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली.
- Advertisement -
Latest article
आगरी बोली संवर्धन पुरस्कार रायगड भूषण प्रा. एल.बी. पाटील यांना प्रदान
उरण दि २३(विठ्ठल ममताबादे )सातारा येथे २१/२२ डिसेंबर रोजी झालेल्या सर्जनशील शब्दवेल साहित्य संमेलनात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पकांत गावंडे यांच्या...
सुमन केदारी यांचे दुःखद निधन
उरण दि २३(विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील पाणदिवे येथील रहिवाशी सुमन शिवाजी केदारी (वय ६५) यांचा गुरवार दिनांक १२/१२/२०२४ रोजी अल्पशा आजाराने दुःखद...
जाणीव सामाजिक सेवाभावी संस्था द्रोणागिरी भूषण पुरस्काराने सन्मानित
उरण दि २३(विठ्ठल ममताबादे )
द्रोणागिरी स्पोर्टस असोसिएशन च्या २४ व्या रायगड जिल्हास्तरिय युवा महोत्सव निमित्त जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय केलेल्या कार्याबद्दल विविध संस्था, संघटनाना,...