उरण दि २६(विठ्ठल ममताबादे) : रयत शिक्षण संस्थेच्या,श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्युनिअर कॉलेज, दहागाव विभाग जासई.ता.उरण. जि.रायगड या विद्यालयात गुरुकुल प्रकल्प अंतर्गत विविध गुणदर्शन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जेएनपीए चे विश्वस्त मा.रवी पाटील, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य सुधीर घरत, भारतीय मजूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री सुरेश पाटील,उरण पंचायत समितीचे माजी सभापती नरेश घरत हे लाभले होते.
विद्यालयाचे प्राचार्य आणि रयत शिक्षण संस्था रायगड विभागाचे विभागीय अधिकारी कोंगेरे एम.के.यांनी प्रमुख पाहुण्यांचे विद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत करून या कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले व पारितोषिक प्राप्त यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून विविध गुणदर्शन कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. सन्माननीय प्रमुख पाहुणे सुरेश पाटील व रवी पाटील यांनीही या कार्यक्रमासाठी आपल्या मनोगतामध्ये शुभेच्छा देऊन यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे चेअरमन अरुण जगे हे होते. रयत गुरुकुल प्रकल्पांतर्गत निबंध, वक्तृत्व, हस्ताक्षर, चित्रकला इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने शैक्षणिक साहित्य रुपी पारितोषिके देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले गेले तसेच रायगड विभागीय वक्तृत्व स्पर्धेत या विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांनी यश संपादन केल्याबद्दल त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.
या विविध गुणदर्शन कार्यक्रमात विद्यालयातील इयत्ता पाचवी ते बारावी अखेरच्या वर्गांनी सहभाग घेतला होता, यामध्ये भावगीते ,लोकगीते, देशभक्तीपर गीते ,चित्रपट गीते, गायन – नृत्य असे अनेक कलाविष्कार विद्यार्थ्यांनी सादर करून उपस्थित सर्व मान्यवर व ग्रामस्थांची मने जिंकली. या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौशल्य पाहून भरघोस अशी बक्षीसे या कार्यक्रमासाठी दिली. या कार्यक्रमास विद्यालयाचे व्हाईस चेअरमन डी.आर. ठाकूर, गोपीनाथ म्हात्रे, प्रभाकर मुंबईकर,सरपंच संतोष घरत,उद्योजक एकनाथ पाटील, मधुकर पाटील, मधुकर म्हात्रे, महादेव म्हात्रे, बाबुराव मढवी, माणिक म्हात्रे,रघुनाथ ठाकूर ,डी.पी. सोनवणे ,घरत टी.टी.श्रीमती. शकुंतलाताई घरत,ग्रामपंचायत सदस्या सौ.जयश्री ठाकूर तसेच रयत सेवक संघाचे महाराष्ट्र समन्वयक नुरा शेख , या विद्यालयाचे माजी प्राचार्य अरुण घाग आणि विद्यार्थी, पालक, शिक्षण प्रेमी नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये सांस्कृतिक विभाग,घरत पी.जे. श्रीमती.घरत एम.के. गुरुकुल प्रमुख ठाकरे एस.पी.जुनिअर कॉलेज विभाग प्रमुख शिंदे एस. एस.रयत शिक्षण संस्थेचे समन्वयक म्हात्रे डी.बी. जेष्ठ शिक्षिका पाटील एस. एस.आणि सर्व वर्गशिक्षक व सेवकांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन घरत पी.जे.व प्रा.अतुल पाटील यांनी केले.