जिल्हा स्तरीय खो-खो स्पर्धेत प्रतिष्ठान महाविद्याल पैठण विजयी

0

पैठण,दिं.१७ : औरंगाबाद  येथील राजे संभाजी भोसले सैनिक शाळेत महानगर पालिका हद्दी बाहेरील जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत पैठण येथील प्रतिष्ठान महाविद्यालयातील 19 वर्षे वयोगटातील मुलांनी गंगापूर च्या संघाचा अंतिम सामन्यात पराभव करून जिल्हास्तरीय स्पर्धेत अपल्या क्रीडा कौशल्याचे उत्कृष्ट सादरीकरण करत जिल्हास्तरीय स्पर्धा जिंकली असून आता प्रतिष्ठान चा सांघ विभागीय स्तरीय खो-खो स्पर्धेत औरंगाबाद जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे.

         या स्पर्धेत प्रतिष्ठान च्या संघाने गंगापूर च्या संघाचा पराभव करून अंतिम सामन्यात पाच गुणांनी दणदणीत  विजय मिळवला. या सामन्यात मोहित ठोंबरे या खेळाडूंने उत्कृष्ट खेळ सादर करत अपल्या संघाची बाजू सवरली. स्पर्धेत महेश सुपेकर, ऋतिक चव्हाण, महेश भांडारे, आदित्य टोपे, आदित्य ब्रम्हराक्षस, गजानन जाधव, अमोल बढे, शुभम ठोंबरे, अक्षय उघडे, अमोल पाचे, विशाल बारे, दर्शन सानप इत्यादी खेळाडूंनी सहभाग घेतला. या खेळाडूंचे  प्रतिष्ठान महाविद्यालयाचे सचिव मा.राजेंद्र पा. शिसोदे ,अध्यक्ष रवींद्र पा.शिसोदे , मा.सुशील भाऊ शिसोदे प्राचार्य डॉ. एस.जि. सोनकांबळे,उपप्रचार्य डॉ.प्रकाश तुरुकमाने,प्रबंधक शेखर शिंदे पाटील, अधीक्षक अरुण बागुल, चाटे , विश्र्वास गव्हाणे पाटील

यांनी अभिनंदन केले  या संघाच्या यशस्वीते साठी क्रीडा संचालक डॉ. वसंत झेंडे,क्रीडा शिक्षक सुधीर नलभे,रवीचंद्र अंधोरीकर,श्री कोकरे व श्री राजपूत यांनी विशेष मेहनत या खेळाडूं कडून करून घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here