जामखेड तालुका प्रतिनिधी – जामखेड तालुक्यातील नान्नज येथील जि प शाळेनी या शैक्षणिक सहल उपक्रम अंतर्गत श्री कमलाभवानी मंदिर करमाळा ,निरा-नृसिंहपूर, अकलूज येथील सयाजीराजे पार्क,शिवसृष्टी किल्ला अकलुज, लेझर शो या विविध ठिकाणी भेट देण्यात आली.
सयाजीराजे पार्क अकलूज या ठिकाणी पारंपरिक रूढी, परंपरा यांचे जतन होण्याच्या दृष्टीने असलेल्या विविध कलाकृती पाहण्याचा ,वॉटर पार्क मध्ये पोहण्याचा, संगीतमय डान्स चा व रेन डान्स,घसरगुंडी चा अनुभव विद्यार्थीनी घेतला. चिल्ड्रेन पार्क मधील विविध पाळणे,झोपाळे,प्राणी रेल्वे, विविध प्राण्यांच्या कलाकृती, कृष्णप्रिया रेल्वे स्टेशन वरून प्रत्यक्ष रेल्वे प्रवासाचा अनुभव, अडव्हेन्चर पार्क मधील विविध झाडे, प्राणी प्रतिकृती, अदभूत आवाज, गुहेतील भटकंती, पाण्यातील पायवाट इ चे थरारक अनुभव घेतले.पार्कमधील निसर्गरम्य वातावरण पाहून विद्यार्थी व विद्यार्थीनी खूप आनंदी झाली.
शिवसृष्टी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य आश्वारूढ पुतळा, त्यांचे संपूर्ण जीवनचरित्र विषध करणारी शिल्प, वस्तुसंग्रहालय,किल्ले प्रतिकृती इ. गोष्टी मुलांनी आपल्या शिक्षकांसमवेत पाहिल्या. नंतर शिवछत्रपती मल्टीमीडिया म्युझिकल लेझर शो पाहण्याचा मुलांनी आंनद घेतला.
अशा प्रकारे शाळेची एकदिवशीय शैक्षणिक सहल मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यामध्ये विद्यार्थ्यांसह शाळेचे मुख्याध्यापक मनोजकुमार कांबळे, विकास बगाडे तर विठ्ठल खरमाळे,प्रियंका खोसे,जयश्री दळवी, किरण माने,सोमनाथ अनारसे इ. शिक्षकवृंद उपस्थित होते.
सहल प्रवास सुखरूप झाल्याबद्दल बसचालक चंद्रकांत वारे पाटील यांचा सन्मान करण्यात आला. शाळेच्या या सहशालेय उपक्रमाबद्दल सर्व पालकांमधून व ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे.