दौड-रावणगाव, परशुराम निखळे :
रावणगाव ता. दौंड येथील जिल्हा परिषेद प्राथमिक शाळा पूर्ववस्ती व अंगणवाडीतील विद्यार्थांना व्यवहाराचे ज्ञान व्हावे म्हणून शेतकरी ते थेट ग्राहक विक्री यासाठी हा बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता.गावातील नागरीक व परिसरातील शिक्षक खरेदी करण्यासाठी जमले होते. दोन तासात या विक्रितून 20 ते 25 हजारांची उलाढाल होऊन सर्व माल संपला. विद्यार्थ्यांनी वडापाव,समोसे, पाणीपुरी,इडली चटणी गुलाबजामुन,भजी,ओलिभेळ, ॲपे, मिठाई,कप केक,गोळ्या बिस्किटे,चहा, स्टेशनरी तसेच घरात बनविलेले विविध खाद्यपदार्थंची विक्री केली.तसेच शेतातील विविध ताज्या भाज्या,भेंडी,पालक,काकडी, कोंथिबीर, कांदे,हिरवी मिरची, वांगी अशा भाज्यांची विक्री केली.
रावणगावच्या सरपंच सौ शोभा गावडे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. शिक्षणाबरोबरच आपल्या विद्यार्थांना स्वतःचे पायावर कसे उभे राहावे? हे अनुभव मुलांना मिळावेत हा उद्देश होता. असे मुख्याध्यापक बाळासो काळे यांनी सांगितले. सूत्रसंचालन अमोल लांभाते यांनी केले. आभार सौ.मानसी सुभेदार यांनी मानले. याप्रसंगी प्रगतिशील शेतकरी राजेंद्र गावडे यांनी मुलांना खाऊसाठी १००० रु दिले. तर मारुती गावडे यांनी 200 रु.दिले. शाळेच्या उत्तम गुणवत्तेमुळे व विविध उपक्रमांमुळे परिसरातील मुले या शाळेत प्रवेश घेत असतात असे सांगितले. सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक रांधवण सर ,राहुल शिंदे सर,पोपट सांगळे सर, श्रीकांत आटोळे सर, खोरे सर, दौंड तालुका अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या उपाध्यक्षा सौ.किरण जांबले यांनी आनंद बाजाराला भेट देऊन विविध वस्तूंची खरेदी करत मुलांचा आनंद द्विगुणित केला.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन आटोळे, उपाध्यक्षा सौ शितल गायकवाड ,भीमा पाटस कारखान्याचे माजी संचालक नारायण आटोळे,संदीप रांधवण ,सतीश गावडे,विवेक गावडे,अंगणवाडी ताई सौ कांता थोरात ,मदतनीस सौ. प्रमिला कांबळे ,सदस्य संतोष आटोळे, सौ अनिता शर्मा, कैलास गावडे, निलेश आटोळे, रमजान खान, प्रल्हाद गावडे , नितीन चव्हाण ,शरद आटोळे,सौ.माधुरी खोमणे, सचिन चव्हाण, त्याचबरोबर पालकवर्ग , माजी विद्यार्थी , ग्रामस्थ व महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.