ज्ञान सरिता ग्रंथ दिंडीमध्ये एस. एम. जोशी कॉलेजचा यशस्वी सहभाग

0

हडपसर प्रतिनिधी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने आयोजित केलेल्या ज्ञान सरिता ग्रंथ दिंडीत  एस. एम. जोशी कॉलेजने उत्साहपूर्ण सहभाग घेतला. प्रत्येक सहभागी महाविद्यालयाला एका महापुरुषाची संकल्पना देण्यात आली होती. एस. एम. जोशी कॉलेजचा विद्यार्थी प्रशांत वानखेडे या स्वयंसेवकाने रवींद्रनाथ टागोर यांची वेशभूषा आणि विचार आणि योगदान प्रभावीपणे सादर केले. ज्ञान सरिता ग्रंथ दिंडीमध्ये १०७ विद्यार्थी (८० मुली आणि २७ मुले) आणि ५ प्राध्यापक यांनी सहभाग घेतला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एन.एस एस. कार्यक्रम अधिकारी  प्रा.हृषीकेश खोडदे, डॉ. निशा गोसावी, डॉ. दिनकर मुरकुटे तसेच एन.एस एस. कमिटी सदस्य  प्रा. स्वप्नील ढोरे,  प्रा. अशोक कांबळे व  प्रा.पुजा गोसावी यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड येथून सुरू झालेल्या दिंडीने फर्ग्युसन कॉलेज पर्यंत ४ कि.मी. अंतर पार केले. या प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांनी ‘पढोगे तो बढोगे’ आणि “It’s not an event, it’s a movement” या घोषवाक्यांसह समाजात वाचन व शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.

एस. एम. जोशी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी रवींद्रनाथ टागोर यांची वेशभूषा, पोस्टर व घोषवाक्यांच्या माध्यमातून त्यांचे विचार सादर केले. फर्ग्युसन कॉलेज येथे दिंडीचा समारोप झाला. त्या ठिकाणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणिवा, वाचन संस्कृतीचा प्रचार आणि साहित्यप्रेम वृद्धिंगत करण्यासाठी योगदान दिले. ज्ञान सरिता ग्रंथ दिंडी या कार्यक्रमातील एस. एम. जोशी कॉलेजचा सहभाग प्रेरणादायी ठरला. ज्याने शिक्षणाचा सामाजिक प्रभाव अधोरेखित केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here