द्रोणागिरी स्पोर्ट्सच्या जिल्हा स्तरीय चित्रकला स्पर्धेत अक्षर कडू प्रथम.

0

उरण दि 26(विठ्ठल ममताबादे )द्रोणागिरी स्पोर्ट्स आसोशिएशन आयोजित रायगड जिल्हा स्तरीय चित्रकला स्पर्धेत  अक्षर सुभाष कडू याने प्रथम क्रमांक पटकावला आहे .अक्षर हा चिरनेर येथील रायगड जिल्हा परीषदेच्या शाळेत  चौथी ईयत्तेत शिकत आहे.अक्षरच्या गटात संपूर्ण जिल्ह्या मधून 80 च्या वर स्पर्धक सहभागी झाले होते.विशेष म्हणजे चित्रकलेचे कोणतेही प्रशिक्षण न घेता अक्षर ने हे यश मिळविले आहे.

द्रोणागिरी स्पोर्ट्स असोशिएशन च्या चित्रकला स्पर्धेत खूप मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते.अक्षरच्या गटा मध्ये 80 च्या वर स्पर्धक असल्याने स्पर्धा चूरशीची झाली.परंतू अक्षर ने काढलेले चित्र पाहता हे चित्र प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरेल हे अगोदरच स्पष्ट झाले होते.ईतके सुंदर चित्र त्याने काढले होते.या आगोदर पहिलीला असताना सकाळ चित्रकला स्पर्धेत देखील अक्षर दूसरा आला होता.

चित्रकलेचे कोणतेही आधुनिक प्रशिक्षण घेतले नसताना आपल्या उपजत कला गूणांच्या जोरावर अक्षर चित्र काढत आहे.यामध्ये त्याला त्याचा ईयत्ता 10 वि मध्ये शिकत असलेला भाउ पृथ्विराज कडू  व आई सुगंधा कडू हे नेहमी मार्गदर्शन करत असतात. त्याच्या या यशाचे चिरनेर मधील नागरीक व राजिप शाळा चिरनेरचेचे मुख्याध्यापक प्रविण म्हात्रे,वर्ग शिक्षीका संगीता गावंड, व शाळेतील सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here