नाशिक जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांची पाताळेश्वर विद्यालयास भेट

0

शालेय परिसर खेळासाठी अतिउत्तम, अविनाश टिळे जिल्हा क्रीडाअधिकारी 

सिन्नर : पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयास जिल्हा क्रीडाअधिकारी शिक्षण विभाग नासिक यांनी भेट देऊन शालेय परिसर व शालेय वातावरण बघून अतिउत्तम असल्याचा शेरा देऊन आपल्या शाळेचे वातावरण विद्यार्थ्यांच्या खेळास पोषक असून तुमच्या या मातीतून विद्यार्थी खरोखरच राज्य व राष्ट्रीय पातळीवर जाण्यास पात्र ठरतात. मात्र त्यांच्यासाठी असणाऱ्या भौतिक सुविधां आम्ही लक्षात घेऊन व पुढील त्यांच्या गरजा भागविण्यासाठी शिक्षण विभागाकडून वेळोवेळी मदत करू असे आश्वासन टिळे यांनी दिले व शालेय परिसराची, क्रीडांगणाची पाहणी करून शाळेसाठी व्यायाम शाळा, क्रीडा साहित्य, शालेय वॉल कंपाऊंड यांच्या असलेल्या गरजा आम्ही विचारात घेऊन त्याचा पाठपुरावा करू असे सांगितले.

यावेळी विभाग व राज्य पातळीवर खेळलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. विद्यालयाच्या क्रीडा शिक्षिका श्रीमती एम. एम. शेख यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढून त्यांनी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार केला व विद्यार्थ्यांसाठी क्रीडा क्षेत्रात अधिकाधिक योगदान करा असे सांगितले. बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांनी आमची ग्रामीण भागातील शाळा सर्व उपक्रमांमध्ये सहभागी होऊन अधिकाधिक गुणवत्तेसोबत विद्यार्थ्यांच्या मानसिक क्षमता विकसित करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. त्यासाठी लागणारे पाठबळ विविध क्षेत्रातीलमान्यवर अधिकारी यांच्याकडून मिळते. परंतु त्यातच महत्वाची बाब म्हणजे शालेय मैदानास वॉल कंपाऊंड व अल्पसे क्रीडा साहित्य याची पूर्तता आपण आम्हाला करून द्यावी म्हणजे आमचे अधिकाधिक विद्यार्थी क्रीडेमध्ये नैपुण्य गाठून त्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतील असे सांगितले. यावेळी त्यांच्या समवेत असलेले चेतन आव्हाड बांधकाम इंजिनिअर यांनी शालेय परिसर व शालेय मैदान पाहून कौतुक केले. 

 यावेळी शिवम शिंदे, प्रथमेश बोगीर, दर्शन शिंदे, योगीराज कडाळे, मोहित आव्हाड, अक्षदा जाधव, सोनाली पाटोळे, रेश्मा पाटोळे, ऋतुजा रेवगडे, अपेक्षा रेवगडे, ईश्वरी पाटोळे या विद्यार्थ्यांचा सत्कार केला.  बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे कोषाध्यक्ष व विद्यालयाचे उपशिक्षक श्री. टि.के. रेवगडे, बी. आर. चव्हाण, आर. व्ही. निकम, एस. एम. कोटकर, आर. टी. गिरी, एम. एम. शेख, सविता देशमुख , सी. बी. शिंदे, के. डी. गांगुर्डे,एस. डी. पाटोळे, आर. एस. ढोली, ए.बी. थोरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here