न्यू ग्लोवल इग्लीश मेडियम स्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात साजरा

0

सिन्नर प्रतिनिधी : न्यू ग्लोबल इगलीश मेडियम स्कूल  चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व विद्यार्थी विविध गुणदर्शन कार्यक्रम दिनांक २१ जानेवारी २०२५ रोजी शाळेच्या मैदानावर उत्साहात साजरा झाला याप्रसंगी प्रमुख अतिथि पदवीधर आमदार नाशिक विभाग नाशिक सत्यजित तांबे व विशेष अतिथी म्हणून नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव  एस. बी. देशमुख हे उपस्थित होते. यावेळीआमदार सत्यजित तांबे म्हणाले या निमित्ताने शाळेला भेट देता आली व विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा उत्साह कार्यक्रमाची यशस्विता दर्शवितो .विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलताच आले पाहिजे, कारण ती जगाची भाषा आहे परंतु त्याचबरोबर आपली मातृभाषा* *देखील आपण विसरता कामा नये असे गैरव उद्गार काढले .

 एस बी देशमुख यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी दाखविलेल्या विविध उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले .शाळा व घरामध्ये विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडत असतात असे ते म्हणाले यावेळी ज्युनिअर के जी ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना विविध पारितोषिकांचे वाटप प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी 24 प्रकारचे विविध कार्यक्रम पाहुण्यांसमोर सादर केले. यावेळी शाळेतील पालक वर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित होता संस्थेचे चेअरमन महेंद्र जोंधळे त्यांचा परिवार व मित्रमंडळी या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे प्राचार्य  एस बी शिरसाट व सर्व शिक्षक मंडळींनी प्रयत्न केले शेवटी सौ प्रीतम कुलकर्णी यांनी आभार मानले 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here