परिपाठ/आजचे पंचाग

0
*_सौ सविता देशमुख_* _*🌻 उपशिक्षिका🌻*_ 🔸 *_पाताळेश्वर माध्यमिक विद्यालय पाडळी ता सिन्नर जि नाशिक_* _*📱7972808064📱*_

*❂ दिनांक :~ 09 ऑक्टोबर 2023 ❂❂ वार ~ सोमवार ❂* paripath educational Enformation

*आजचे पंचाग *

━═•●◆❃★❂★❃◆●•═━

*भाद्रपद. 09 ऑक्टोबर*

*तिथी : कृ. दशमी (सोम)*   

*नक्षत्र : आश्लेषा,*

*योग :- सिद्ध*

*करण : बव*

*सूर्योदय : 06:45, सूर्यास्त : 05:58,*

 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*सुविचार *

     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

*पुस्तकं माणासाला रद्दी होण्यापासून वाचवतात.*

 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*म्हणी व अर्थ *

*खऱ्याला मरण नाही.* 

*अर्थ:- खरे कधी लपत नाही, ते कधी तरी उघडे होतेच.*

 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

* दिनविशेष *   

*या वर्षातील 282 वा दिवस आहे.*_

* महत्त्वाच्या घटना *

*१९४७: भारत सरकारने जूनागढ संस्थान बरखास्त करुन ताब्यात घेतले.*

*१९५४: दार्जीलिंग या थंड हवेच्या ठिकाणी हिमालय पर्वतारोहण संस्थेची स्थापना करण्यात आली होती.*

*१९८८: मुंबईतील भारत पेट्रोलियमच्या शुद्धीकरण संकुलातील दुर्घटना, भीषण आगीत १२ जण मृत्युमुखी.*

*१९८९: ब्रिटनने मृत्यू दंडाच्या शिक्षेवर पूर्णपणे बंदी घातली होती.*

*१९९७: साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांना ’कुसुमाग्रज प्रतिष्ठान’चा जनस्थान पुरस्कार प्रदान*

*२०००: न्यूयॉर्क येथे झालेल्या एका लिलावात पाब्लो पिकासोचे एक चित्र पाच कोटी छप्पन्न लाख डॉलरला विकले गेले. पिकासोच्या चित्रासाठी मिळालेली ही विक्रमी किंमत आहे.*

*२०००: उत्तराखंड राज्याची निर्मिती.*

*२००१: पूर्व पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी आजच्याच दिवशी संयुक्त राष्ट्र या जागतिक संस्थेच्या महासभेला संबोधित केले होते.*

*जन्मदिवस / जयंती*

*१८८३: मार्टिन ल्युथर यांचा जन्म झाला होता.*

*१९०४: पंचानन माहेश्वरी – सपुष्प वनस्पतींतील पुनरुत्पादन क्रियेसंबंधी संशोधन करणारे वनस्पतीशास्त्रज्ञ (मृत्यू: १८ मे १९६६)*

*१९२४: पं. चिंतामणी रघुनाथ तथा सी. आर. व्यास – ख्यालगायक, गुरु व बंदिशकार (मृत्यू: १० जानेवारी २००२)*

*१९३१: एल. एम. सिंघवी – लोकसभा सदस्य, कायदेपंडित, विद्वान, मुत्सद्दी व भारताचे इंग्लंडमधील राजदूत (मृत्यू: ६ आक्टोबर २००७)*

*१९३४: कार्ल सगन – अमेरिकन अंतराळतज्ञ, लेखक व विज्ञानप्रसारक. यांनी सुमारे ६०० हून अधिक शोध निबंध प्रकाशित केले. शुक्राच्या पृष्ठभागावरील उच्‍च तापानाचा शोध त्यांच्या प्रयत्‍नामुळे लागला. (मृत्यू: २० डिसेंबर १९९६- सिअ‍ॅटल, वॉशिंग्टन, यु. एस. ए.)*

   

*मृत्यू / पुण्यतिथी*

*१९६२: महर्षी अण्णासाहेब तथा धोंडो केशव कर्वे – स्त्रीशिक्षण व विधवा विवाह यातील कर्ते समाजसुधारक, पद्मभूषण, भारतरत्‍न (जन्म: १८ एप्रिल १८५८)*

*१९७७: केशवराव भोळे – गायक, अभिनेते, संगीत समीक्षक, संगीत रचनाकार, संगीत दिग्दर्शक व लेखक. ’अमृतमंथन’, ’संत तुकाराम’, ’ कुंकू’, ’माझा मुलगा’,’ संत ज्ञानेश्वर’, ’संत सखू’ आदी बोलपटांतील गीतांच्या स्वररचना आणि संगीत दिग्दर्शन त्यांनी केले होते. ’एकलव्य’ या टोपणनावाने त्यांनी ’वसुंधरा’ या साप्ताहिकात अभिजात गायक-गायिकांविषयीचे लेख लिहिले. क्रिकेटवरही ते अभ्यासपूर्ण लेखन करत असत. (जन्म: २३ मे १८९६)*

*👉२००३: मैथिली भाषेतील लेखक व कवी विनोद बिहारी वर्मा यांचे निधन.*

*२००५: फ्रांस या देशात आजच्याच दिवशी आणीबाणी घोषित करण्यात आली होती.*

*२००५: के. आर. नारायणन – भारताचे १० वे राष्ट्रपती (जन्म: २७ आक्टोबर १९२०)*

*२०११: हर गोविंद खुराना – जन्माने भारतीय असलेले अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: ९ जानेवारी १९२२)*

 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*सामान्य ज्ञान *

     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

*सध्या सुरू असलेला मराठी महिना कोणता?*

 * भाद्रपद*

*अमेरिकेने कोणत्या दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकले होते?*

*हिरोशिमा व नागासाकी*

*NEWS न्यूज या शब्दाचे संक्षिप्त (पूर्ण) रूप काय आहे?*

*North, East, West, South*

*सर्वात जास्त शुद्धता असणारे पाणी कोणते असते?*

*पावसाचे पाणी*

*भारतातील अनुविज्ञानाचे जनक कोण  आहेत?*

*डॉ. होमी भाभा*

 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

* बोधकथा *

*बासरी वाला आणि उंदीर*

अनेक वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका गावात खूप उंदीर झाले होते. घरात, शेतात, दुकानात सगळीकडे नुसते उंदीरच उंदीर होते. त्यामुळे अन्न – धान्याचे नुकसान होत होते. कोणत्याही परिस्थितीत उंदरांचा नाश करायचा असे गावकरी ठरवतात. पण, अनेक उपाय करूनही उंदरांचा नाश होत नाही. त्यामुळे गावकरी खूप त्रस्त होतात. ही गोष्ट शेजारी राहणाऱ्या गावातील एका बासरीवाल्या मुलाला कळते. मग तो गावात येतो व गावकऱ्यांना सांगतो की, ‘मी या उंदरांचा बंदोबस्त करू शकतो पण त्या बदल्यात तुम्ही मला शंभर सुवर्णमुद्रा दयाव्यात.’ गावकरी तयार होतात. मग, तो बासरीवाला बासरी वाजवत गावात फिरू लागतो. त्याच्या बासरीच्या आवाजामुळे गावातील सर्व उंदीर त्याच्याकडे आकर्षित होतात व त्याच्यामागे धावू लागतात. तो मुलगा गावाबाहेरील नदीत जातो त्याच्याबरोबर उंदीरही पाण्यात जातात आणि पाण्यात बुडून मरतात.* *बासरीवाला मुलगा गावकऱ्यांकडे आपल्या कामाचा मोबदला मागतो परंतु गावकरी ठरल्याप्रमाणे त्याला शंभर सुवर्णमुद्रा दयायला नकार देतात. बासरीवाल्याला कळते की गावकरी लबाड आहेत. तो म्हणतो की, ‘आता मी तुम्हाला कशी अद्दल घडवतो ते बघा.’ तो पुन्हा गावात बासरी वाजवत फिरू लागतो. पण यावेळी बासरीच्या आवाजाने गावातील लहान मुले त्याच्याकडे आकर्षित होतात व तेही त्याच्यामागे धावू लागतात.गावकऱ्यांना भीती वाटू लागते की, बासरीवाला उंदराप्रमाणे आपल्या मुलांनाही नदीत घेऊन जाईल. त्यामुळे गावकरी त्याला थांबवतात व ठरल्याप्रमाणे शंभर सुवर्णमुद्रा देतात.*

*तात्पर्य – जो आपल्यावर उपकार करतो त्याला कधीही विसरू नये.*

 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

एस. बी देशमुख *सेक्रेटरी :-बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्था सिन्नर, जि. नाशिक.* 

*मुख्याध्यापक :- पाताळेश्वर माध्यमिक विद्यालय पाडळी, ता. सिन्नर. जि . नाशिक*

*सचिव :- नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ. नाशिक*_ 

*समन्वयक :- नाशिक व अहमदनगर जिल्हा शिक्षण संस्थाचालक महामंडळ.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here