परीपाठ/आजचे पंचाग/दिनविशेष

0

दिनांक :~ 11 मार्च 2023 ❂🎴 वार ~ शनिवार 🎴

      *🏮 आजचे पंचाग 🏮*
━═•●◆❃★❂★❃◆●•═━

फाल्गुन. 11 मार्च
तिथी : कृ. चतुर्थी (शनी)
नक्षत्र : चित्रा,
योग :- ध्रुव
करण : बव
सूर्योदय : 06:53, सूर्यास्त : 06:02,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🖋 सुविचार 🖋
┅━═▣◆★✧★◆▣═━┅

💡कळकळ ही जीवनाची सुरूवात करते तर त्याग हा त्याचा शेवट करतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
म्हणी व अर्थ

📌अढ़ीच्या दिढ़ी सावकाराची गढ़ी

🔍अर्थ:-
अडकलेला माणूस सावकाराच्या पाशात सापडतो
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📆 दिनविशेष 📆

🌞या वर्षातील🌞 70 वा दिवस आहे.

*🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*

👉१३९९: दिल्ली समवेत संपूर्ण उत्तर भारतात हाहाकार माजवून सुलतान तैमुर लंग यांनी सिंधू नदी पार केली होती.
👉१८८६: पहिली भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना डॉक्टर ही पदवी मिळाली भारतातील पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवणाऱ्या डॉ. आनंदीबाई जोशी यांना फ़िलाडेफ़िल्या विद्यापीठाची एस.डी. ही पदवी बहाल करण्यात आली
👉१८८९: पंडिता रमाबाई यांनी मुंबई मध्ये शारदासदन हि शाळा विधवा आणि कुमारीकांसाठी सुरु केली.
👉१८१८: इंग्रज फौजांनी पुरंदरला वेढा घातला.
👉१९१८: मॉस्को हे शहर रशियाची राजधानी म्हणून घोषित करण्यात आले होते.
👉१९९३: उडिया कवी व साहित्यिक रमाकांत रथ यांना उपराष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते ‘सरस्वती सन्मान’ पुरस्कार प्रदान.
👉२००१: कसोटी क्रिकेटमधे हॅटट्रिक घेणारा हरभजनसिंग हा पहिला भारतीय गोलंदाज बनला. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही कामगिरी केली.
👉२००१: बॅडमिंटनपटू पी. गोपीचंदने तब्बल एकवीस वर्षानी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद भारतास मिळवून दिले. या आधी प्रकाश पदुकोण यांनी ते मिळवले होते.
👉२०११: जपानमधील सेन्डाइच्या पूर्वेला झालेल्या ८.९ रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने त्सूनामीची प्रचंड लाट आली. यात जपानमधील हजारो लोक मृत्यूमुखी पडले.

*🌹जन्मदिवस / जयंती🌹*

👉१८४०: बंगाली भाषेत संगीत नाटकाला सुरुवात करणारे तत्वज्ञानी, लेखक, अनुवादक, कवी, गणितज्ञ व संगीतकार तसेच देवेंद्रनाथ टागोर यांचे थोरले पुत्र द्विजेंद्रनाथ टागोर यांचा जन्मदिन.
👉१८६३: मराठ्यांच्या शाही गायकवाड घराण्यातील बडोदा प्रांताचे राजे महाराज सयाजीराव गायकवाड यांचा जन्मदिवस.
👉१९१५: विजय हजारे – क्रिकेटपटू (मृत्यू: १८ डिसेंबर २००४)
👉१९२७: रेमन मैग्सेस पुरस्कार विजिता भारतीय महिला चिकित्सक वी.शांता यांचा जन्मदिवस.
👉१९८५: अजंता मेंडिस – श्रीलंकेचा गोलंदाज

  *🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*

👉१६८९:  औरंगजेबाच्या कैदेमध्ये असलेल्या संभाजीराजांची अतिशय हालहाल करुन हत्या करण्यात आली पेनिसिलीनचे शोधक सर फ्लेमिंग पुण्यतिथी
👉१६८९: छत्रपती संभाजी महाराज (जन्म: १४ मे १६५७)
👉१८८१: ब्रिटीश कालीन भारतातील कोलकाता येथील थोर समाज सुधारक रामनाथ टागोर यांची प्रतिमा कोलकाता येथील टाऊन हॉल मध्ये स्थापित करण्यात आली.
👉१९५५: अलेक्झांडर फ्लेमिंग – नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ (जन्म: ६ ऑगस्ट १८८१)
👉१९५७: दक्षिण आणि उत्तर ध्रुवावर जाणारा पहिला अमेरिकन वैमानिक आणि समन्वेशक रिचर्ड ईव्हेलिन बर्ड यांचे निधन.
👉१९६५: गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा ’धूमकेतू’ – गुजराथी कथाकार व कादंबरीकार. त्यांच्या ७ उत्कृष्ट कथांचा संग्रह ’सप्तपर्ण’ या नावाने प्रकाशित झाला आहे. (जन्म: १२ डिसेंबर १८९२)
👉१९८०: भारतीय स्वातंत्र्य सेनानी आणि उत्तर प्रदेश राज्याचे भूतपूर्व मुख्यमंत्री चंद्रभानु गुप्ता यांचे निधन.
👉१९९३: शाहू मोडक – हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते, (संत ज्ञानेश्वर, माझा मुलगा, माणूस, त्यांनी [जन्माने ख्रिश्चन असूनही] २९ चित्रपटांत कृष्णाची भूमिका साकारली) (जन्म: २५ एप्रिल १९१८ – अहमदनगर)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🥇सामान्य ज्ञान 🥇
┅━═▣◆★✧★◆▣═━┅

👉चिल्का हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे?
🥇ओरिसा

👉कळसुबाई हे नाव कशाशी संबधित आहे?
🥇पर्वत शिखर

👉ज्वारीच्या उत्पादनात महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो?
🥇प्रथम

👉चंदनाचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते?
🥇कर्नाटक

👉सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
🥇नर्मदा
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🕸 बोधकथा 🕸

आपलेपण “

   एक गरुड़ पक्षी एका उंच कड्यावर बसून ससा टेहळित असता एका तिरंदाज पारध्याने त्यास पाहिले. आणि अचूक नेम धरून तीर सोडला. तो तीर त्या गरुडाच्या मर्मस्थानी लागून तो अगदी मरनोन्मुख झाला. मरता मरता उरात शिरलेल्या तिराकडे त्याची नजर गेली आणि तो पाहतो तर त्या तिराच्या पिसा-यास त्याचीच पिसे लावलेली त्याच्या दृष्टिस पडली.
   तेव्हा  तो म्हणाला..."माझ्या पंखातील पिसांनी त्याचा पिसारा सज्ज केला आहे."
अशा तिराने मी मरावे याबद्दल मला वाईट वाटले.*

🧠तात्पर्य :-
आपल्यावर आलेले संकट आपल्याच लोकांच्या मदतीने उत्पन झालेले पाहून त्याबद्दलचे दुःख दुणावते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

श्री. देशमुख. एस. बी,🌻सचिव🌻 नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ📱7972808064📱
🙏🌹 सेक्रेटरी -बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्था सिन्नर 🌹🙏मुख्याध्यापक पाताळेश्वर विद्यालय पाडळी🌹 सचिव , प. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ, पुणे .
🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here