*सौ . सविता देशमुख उपशिक्षिका पाताळेश्वर विद्यालय पाडळी ता सिन्नर* *7972808064*
*दिनांक :~ 16 डिसेंबर 2022**वार ~ शुक्रवार*
*आजचे पंचाग*
*मार्गशीर्ष. 16 डिसेंबर*
*तिथी : कृ. अष्टमी (शुक्र)*
*नक्षत्र : पू. फाल्गुनी,*
*योग :- प्रीती*
*करण : बालव*
*सूर्योदय : 06:58, सूर्यास्त : 05:52,* *सुविचार*
*ज्याला वास्तव स्वीकारणे चांगले जमते तोच मनुष्य आपल्या आयुष्यात सदैव यशस्वी होतो..*
*म्हणी व अर्थ*
*अघळ पघळ अन् घाल गोंधळ.*
*अर्थ:- मोठ मोठ्या गोष्टी करणाऱ्या व्यक्ती कामात आळशी असते.*
*दिनविशेष*
*भारतीय विजय दिवस*
*या वर्षातील 350 वा दिवस आहे.*
*महत्त्वाच्या घटना*
*१९९१ : पुर्वीच्या सोविएत संघराज्यातुन (USSR) फुटून कझाकस्तान हा स्वतंत्र देश झाला.*
*१९८५ : कल्पक्कम येथील ’इंदिरा गांधी अणूसंशोधन केंद्रातील (IGCAR) प्रायोगिक ’फास्ट ब्रीडर रिअॅक्टर’ राष्ट्राला समर्पित*
*१९७१ : भारत पाक युद्ध – पाक सैन्याची शरणागती, बांगलादेशची निर्मिती*
*१९३२ : ’प्रभात’चा ’मायामच्छिंद्र’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.*
*१९०३ : मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल ग्राहकांसाठी खुले करण्यात आले.*
*१७७३ : अमेरिकन राज्यक्रांती – बॉस्टन टी पार्टी*
*१४९७ : वास्को-द-गामाने केप ऑफ गुड होपला वळसा घातला.*
*जन्मदिवस / जयंती*
*१९१७ : सर आर्थर सी. क्लार्क – विज्ञान कथालेखक व संशोधक (मृत्यू: १९ मार्च २००८)*
*१८८२ : जॅक हॉब्ज – इंग्लिश क्रिकेट खेळाडू (मृत्यू: २१ डिसेंबर १९६३)*
*१७७५ : जेन ऑस्टिन – इंग्लिश लेखिका (मृत्यू: १८ जुलै १८१७)*
*१७७० : लुडविग व्हान बीथोव्हेन या कर्णबधिर संगीतकाराचा जन्म. मी स्वर्गात नक्कीच संगीत ऐकू शकेन, हे त्याचे अखेरचे शब्द होते. (मृत्यू: २६ मार्च १८२७)*
*मृत्यू / पुण्यतिथी*
*२००४ : लक्ष्मीकांत बेर्डे – अभिनेता (जन्म: ३ नोव्हेंबर १९५४)*
*२००० : सुमारे ४० वर्षे नवनवे चित्तथरारक खेळ व कसरती सादर करुन परदेशातही वाहवा मिळवलेले सर्कस सम्राट काशिनाथ सखाराम तथा बंडोपंत देवल यांचे वयाच्या १०१ व्या वर्षी मिरज येथे निधन झाले. त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षी सर्कसमधे काम करण्यास सुरूवात केली होती. (जन्म: ? ? १८९९)*
*१९८० : कर्नल सँडर्स – ’केंटुकी फ्राईड चिकन’ (KFC) चे संस्थापक (जन्म: ९ सप्टेंबर १८९०)*
*१९६५ : डब्ल्यू. सॉमरसेट मॉम – इंग्लिश लेखक व नाटककार (जन्म: २५ जानेवारी १८७४)*
*१९६० : चिंतामण गणेश कर्वे – मराठी कोशकार व लेखक, महाराष्ट्र शब्दकोश, महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश, शास्त्रीय परिभाषा कोश यांचे संपादक (जन्म: ४ फेब्रुवारी १८९३)*
*सामान्य ज्ञान*
*सुनील गावसकर ही व्यक्ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे?*
*क्रिकेट*
*भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे?*
*वंदे मातरम्*
*संत जनार्दन स्वामी यांची समाधी स्थळ कोठे आहे?*
*कोपरगांव*
*आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती?*
*स्वामी दयानंद सरस्वती*
*भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात उगवतो?*
*अरुणाचल प्रदेश*
*बोधकथा*
*घार व कबुतरे*
*एका खुराड्यात काही कबुतरे होती. त्यांना मारून खावे या उद्देशाने एक घार त्या खुराड्याभोवती फार दिवस घिरट्या घालून कंटाळली, पण एकही कबुतर तिच्या हाती लागले नाही. मग तिने एक युक्ती केली. ती मोठ्या संभावितपणे कबुतरांजवळ गेली व त्यांना म्हणाली, ‘अहो, माझ्यासारख्या बळकट व शूर पक्ष्याला जर तुम्ही आपला राजा कराल तर ससाणे नि तुमचे शत्रू यांच्यापासून मी तुमचे रक्षण करीन.’ ससाण्याकडून होणार्या त्रासाला कबुतरे इतकी कंटाळली होती की त्यांनी घारीचे म्हणणे लगेच मान्य केले व तिला आपल्या खुराड्यात राहायला जागा दिली. पण दररोज ही घार खुराड्यातल्या एका कबुतराला मारून खाते, असे त्यांच्या लवकरच लक्षात आले व विचार न करता ह्या दुष्ट पक्ष्याला घरात जागा दिल्याबद्दल त्यांना फार पश्चात्ताप झाला.*
*तात्पर्य*
*एका शत्रूपासून रक्षण व्हावे म्हणून दुसर्या शत्रूचे साहाय्य घेणे मूर्खपणाचे होय.*
*मुख्याध्यापक :- पाताळेश्वर विद्यालय पाडळी, ता. सिन्नर*
*सचिव:- बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्था सिन्नर,*सचिव :- प. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणे.*