परीपाठ/पंचाग/दिनविशेष

*दिनांक :~ 17 डिसेंबर 2022**वार ~ शनिवार* 

0
*सौ . सविता देशमुख उपशिक्षिका पाताळेश्वर विद्यालय पाडळी , ता -सिन्नर. 7972808064*

 

*दिनांक :~ 17 डिसेंबर 2022**वार ~ शनिवार* 

*आजचे पंचाग* 

*मार्गशीर्ष. 17 डिसेंबर*

*तिथी : कृ. नवमी (शनी)*   

*नक्षत्र : उ. फाल्गुनी,*

*योग :- आयुष्मान / सौभाग्य*

*करण : तैतिल*

*सूर्योदय : 06:58, सूर्यास्त : 05:52,*

*सुविचार* 

*लोकांचा जास्त विचार करू नका कारण ज्याच्याकडे काही नाही त्याला हसतात आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याच्या वर जळतात.*

           *म्हणी व अर्थ* 

*उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी.*

*अर्थ :- प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो.*

*दिनविशेष*     

*या वर्षातील 351 वा दिवस आहे.*

*राइट ब्रदर्स दिवस.*

*महत्त्वाच्या घटना* 

*१९२७: हिन्दुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे क्रांतिकारक राजेन्द्र नाथ लाहिरी यांना ब्रिटिश सरकारने निर्धारित तारखेच्या दोन दिवस आधीच गोंडा तुरुंगात फाशी दिले.*

*१९२८: भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स साँडर्स याची लाहोर येथे हत्या केली.*

*१९४१: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांचे उत्तर बोर्निओ येथे आगमन.*

*१९७०: जयंतीलाल छोटालाल शहा यांनी भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.*

*२०१६: शरद पवार यांनी एमसीए (मुंबई क्रिकेट असोसिएशन) च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.*

*२०१६: लेफ्टनंट जनरल बिपीन रावत यांची लष्करप्रमुखपदी आणि एअर चिफ मार्शल बी. एस. धनाओ यांची वायुदलप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.*

*२०१६: आयपीएस ए. के. धस्माना यांची रॉ च्या प्रमुखपदी तर राजीव जैन यांची आयबी च्या, प्रमुख पदी निवड करण्यात आली.*

*२०१६: विजेंदर सिंग यांनी फ्रान्सिस चेका ला हरवून डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट जेतेपद स्वतःकडेच जिकून ठेवले.*

*जन्मदिवस / जयंती*

*१७७८: विद्युत पृथक्‍करणाद्वारे सोडिअम आणि पोटॅशिअम ही मूलद्रव्ये प्रथमच वेगळी करणारे इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ सर हंफ्रे डेव्ही यांचा जन्म. (मृत्यू: २९ मे १८२९)*

*१८४९: देशभक्त, काँग्रेसचे १६ वे अध्यक्ष लालमोहन घोष यांचा कलकत्ता येथे जन्म. (मृत्यू: १८ ऑक्टोबर १९०९)*

*१९०१: मराठी लघुकथाकार व प्रसाद मासिकाचे संपादक यशवंत गोपाळ तथा य. गो. जोशी यांचा जन्म. (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९६३)*

*१९०५: भारताचे सहावे उपराष्ट्रपती आणि अकरावे सरन्यायाधीश मुहम्मद हिदायतुल्लाह यांचा जन्म. (मृत्यू: १८ सप्टेंबर १९९२)*

*१९२४: पत्रकार, द हिन्दू चे संपादक गोपालन कस्तुरी यांचा जन्म. (मृत्यू: २१ सप्टेंबर २०१२)*

*१९७२: अभिनेते व मॉडेल जॉन अब्राहम यांचा जन्म.*

*१९७८: अभिनेते रितेश देशमुख यांचा जन्म.*

*मृत्यू / पुण्यतिथी* 

*१७४०: पेशवाईतील पराक्रमी सेनापती चिमाजी अप्पा यांचे निधन.*

*१९३३: १३ वे दलाई लामा थुब्तेन ग्यात्सो यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी १८७६)*

*१९३८: बंगाली कथालेखक व कादंबरीकार चारुचंद्र बंदोपाध्याय यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १८७६ – चांचल, माल्डा, बांगला देश)*

*१९५६: गायक व संगीतशिक्षक पं. शंकरराव व्यास यांचे निधन. (जन्म: २३ जानेवारी १८९८)*

*१९५९: स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या यांचे निधन. (जन्म: २४ डिसेंबर १८८० – गुंडुगोलानू, पश्चिम गोदावरी, आंध्र प्रदेश)*

*१९६५: भारतीय भूदलाचे ६ वे सरसेनापती जनरल कोडेन्डेरा सुबय्या तथा के. एस. थिमय्या यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १९०६)*

*१९८५: नाटककार, कथाकार आणि पटकथाकार मधुसूदन कालेलकर यांचे निधन. (जन्म: २२ मार्च १९२४)*

*२०००: अ‍ॅथलॅटिक्सचे पितामह आणि नामवंत प्रशिक्षक जाल पारडीवाला यांचे निधन.*

*२०१०: पुणे विद्यापीठाचे कुलगुरू देवदत्त दाभोळकर यांचे निधन. (जन्म: २३ सप्टेंबर १९१९)*

*२०१९:मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील जेष्ठ अभेनेते डॉ. श्रीराम लागू यांचे निधन. (जन्म: १६ नोव्हेंबर १९२७)*

*सामान्य ज्ञान* 

*नाशिक शहरातून कोणती नदी वाहते?* 

*गोदावरी*

*भारताच्या मुख्य भूमीचा दक्षिण किनारा कोणता आहे?*

*कन्याकुमारी*

*इंग्रजी महिन्याचा शेवट कोणत्या महिन्याने होतो* ?                                                                                                                        *डिसेंबर*

*गुलाबी शहर कोणत्या शहराला म्हणून ओळखले जाते?*

*जयपूर*

*पृथ्वीच्या मध्यातून जाणा-या काल्पनिक रेषेस काय म्हणतात?*

*विषुववृत्त*

*बोधकथा* 

*गरीबाची हेटाळणी* 

*प्रयाग (गया) येथे एक खूप चांगले पंडित राहत होते. एकदा नेपाळचे राजे सामान्य वेशात पंडीतामागे फिरू लागले, माझ्या आजोबांचे पिंडदान करून द्या, माझ्याजवल  काहीच पैसे नाहीत थोडेसे लाडू भरून आणलेत तेच दक्षिणा  स्वीकार करून घ्या.  जे लोभी पंडित होते त्यांना पैशाची हाव होती त्यांनी या सामान्य वेशातील राजांना नकार दिला. अशा वेळेस राजांना तेथील  एक पंडित गाठ पडला. त्याला महाराजांनी पिंडदान करण्याची विनंती केली. त्याने ती कबूल केली. तो म्हणाला ,  भाऊ ! पैशाची काही बाब नाही. मी पिंडदान करून देतो.  त्या पंडिताने फाटक्या  तुटक्या कपड्यात आलेल्या राजांचे पिंडदान पूर्ण करून दिले. यावर महाराज खुश झाले. त्या वेळेस ते त्याला म्हणाले, पंडितजी! या कार्यानंतर काही न काही दक्षिणा मी तुम्हास देणे लागतो. मी घरून काही लाडू आणले आहेत त्याचा तुम्ही स्वीकार करावा.मात्र या लाडूचे गाठोडे तुम्ही घरी जाऊन उघडावे.  पंडित म्हणाले ,  बर भाऊ तुम्ही गरीब दिसत पण तुम्ही प्रेमाने दिलेल्या लाडूचा मी स्वीकार करतो.  या नंतर पंडितास ते गाठोडे देऊन राजे निघून गेले. पंडिताने घरी जाऊन जेवायला बसायची तयारी केली. अचानक त्याला लाडूची आठवण झाली त्यावर त्याने ते गाठोडे सोडून पहिले असता तो चकित झाला कारण त्या गाठोड्यात वीस सोन्याचे लाडू होते.*

*तात्पर्य:- लोभी पंडितांनी लाडू नको म्हणून गरीबाची हेटाळणी केली मात्र त्याच गरिबाने वीस सोन्याचे लाडू दिले.*

*मुख्याध्यापक :- पाताळेश्वर विद्यालय पाडळी, ता. सिन्नर* 

*सचिव:- बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्था सिन्नर,**सचिव :- प. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणे.* *सौ . सविता देशमुख उपशिक्षिका पाताळेश्वर विद्यालय पाडळी , ता -सिन्नर.  7972808064* 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here