परीपाठ/पंचाग/दिनविशेष 

0
*सौ . सविता देशमुख,   अपशिक्षिका पाताळेश्वर विद्यालय पाडळी ता. सिन्नर जि. नाशिक*  *7972808064*

*दिनांक :~ 21 डिसेंबर 2022*वार ~ बुधवार* 

*आजचे पंचाग* 

*मार्गशीर्ष. 21 डिसेंबर*

*तिथी : कृ. त्रयोदशी (बुध)*   

*नक्षत्र : विशाखा,*

*योग :- धृती*

*करण : गर*

*सूर्योदय : 06:59, सूर्यास्त : 05:50,*

*सुविचार* 

*”माघार” हा शब्द डोक्यातून काढल्याशिवाय विजयाची सवय आपल्याला लागत नाही…!*

*म्हणी व अर्थ* 

*अपयश हे मरणाहून वोखटे.*

*अर्थ:- अपयश मरणापेक्षा भयंकर आहे व लाजीरवाणे आहे.*

*दिनविशेष*    

*या वर्षातील 355 वा दिवस आहे.*

*महत्त्वाच्या घटना* 

*१८९८: पियरे आणि मेरी क्यूरी यांनी रेडियम चा शोध लावला.*

*१९०५: स्वातंत्र्यवीर सावरकर बी. ए. ची परिक्षा उत्तीर्ण झाले.*

*१९०९: अनंत कान्हेरे यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी जॅक्सन यांचा गोळ्या घालून वध केला.*

*१९१३: ऑर्थर वेन यांनी लिहिलेले जगातील पहिले शब्दकोडे (Crossword Puzzle) न्यूयॉर्क वर्ल्ड या दैनिकात प्रकाशित झाले.*

*१९५२: सोवियत संघाचा लेनिन शांती पुरस्कार मिळवणारे सैफुद्दीन किचलू पहिले भारतीय बनले.*

*१९६५: दादा कोंडके निर्मित व दिग्दर्शित आणि वसंत सबनीस लिखित ’विच्छा माझी पुरी करा’ या नाटकाचा पहिला प्रयोग धोबीतलाव येथील रंगभवन येथे झाला.*

*१९८६: रघुनंदन स्वरुप पाठक यांनी भारताचे १८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.*

*२०१२: आजच्या दिवशी गंगनम स्टाइल हे कोरियन गाण्याला यु ट्यूब वर १ अब्ज लोकांनी पाहिले.*

*जन्मदिवस / जयंती*

*१९२१: पी. एन. भगवती – भारताचे १७ वे सरन्यायाधीश*

*१९३२: भारतीय लेखक, कवी आणि समीक्षक यू.एन. अनंतमूर्ती यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑगस्ट २०१४)*

*१९५०: ड्रीमवर्क्स अॅनिमेशनचे सहसंस्थापक जेफरी कॅझनबर्ग यांचा जन्म.*

*१९५९: कृष्णम्माचारी श्रीकांत – धडाडीचे आघाडीचे फलंदाज, क्रिकेट कप्तान व निवड समितीचे अध्यक्ष*

*१९५९: फ्लॉरेन्स ग्रिफिथ जॉयनर – अमेरिकेची धावपटू (मृत्य़ू: २१ सप्टेंबर १९९८)*

*१९६३: हिंदी चित्रपट अभिनेते गोविंदा यांचा जन्म.*

*मृत्यू / पुण्यतिथी*

*१९६३: जॅक हॉब्ज – इंग्लिश क्रिकेट खेळाडू (जन्म: १६ डिसेंबर १८८२)*

*१९७९: नरहर रघुनाथ तथा न. र. फाटक – चरित्रकार, टीकाकार, इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक व लेखक (जन्म: १५ एप्रिल १८९३)*

*१९९३: मल्हार रंगनाथ तथा राजाभाऊ कुलकर्णी – स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार (जन्म: ? ? ????)*

*१९९७: निवृत्तीनाथ रावजी पाटील ऊर्फ ’पी. सावळाराम’ – भावगीतलेखक. कुसुमाग्रज यांनी त्यांना ’जनकवी’ ही उपाधी दिली. १९८५ मधे जयसिंगपूर येथे झालेल्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. (जन्म: ४ जुलै १९१४)*

*१९९७: पं. प्रभाशंकर गायकवाड – सनईवादक (जन्म: ? ? ????)*

*२००४: भारतीय न्यूरोलॉजिस्ट औतार सिंग पेंटल यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १९२५)*

*सामान्य ज्ञान* 

*गौतम बुद्धांचे लहानपणीचे नाव काय होते ?*

*सिद्धार्थ*

*रातांधळेपणा कोणत्या व्हिटामिन च्या कमतरतेमुळे होतो ?*

*व्हिटामिन ए*

*मासे कशाच्या सहाय्याने श्वास घेतात ?*

*कल्ले*

*राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराचे पहिले विजेते कोण आहेत ?*

*विश्वनाथन आनंद*

*तीन राजधान्या असलेले पहिले राज्य कोणते ?*

*आंध्रप्रदेश*

 बोधकथा 

*खरा मिञ* 

*आश्रमात राहणाऱ्या शिष्यांनी एके दिवशी आपल्या गुरूला एक प्रश्न विचारला,”गुरुजी !धन, कुटुंब आणि धर्म यापैकी खरा सहकारी कोण आहे? ” गुरुजींनी एक कथा ऐकवली. ती पुढीलप्रमाणे – एका व्यक्तीला तीन मित्र होते,तिघांपैकी पहिला त्याला प्रिय होता. तो प्रत्येक दिवशी त्याला भेटायचा. प्रत्येक कामात त्याची सोबत करायचा. दुसऱ्या मित्राबरोबर त्याची मध्यम स्वरूपाची मैत्री होती. दुसरा मित्र २-३ दिवसातून भेटायचा आणि क्वचितच त्याच्या सोबत असायचा. तिसरा मित्राला मात्र तो २ महिन्यात एकदा भेटायचा आणि कोणत्याही कामात त्याची मदत घेत नसे. एकदा त्या व्यक्तीकडून काहीतरी चूक झाली. त्यामुळे त्याला राजदरबारात बोलावण्यात आले. तो घाबरला. त्याने पहिल्या मित्राला सांगितले व नेहमीप्रमाणे सोबत राहण्याचा आग्रह केला. मात्र त्याने सर्व गोष्ट ऐकून सोबत राहण्यास नकार दिला. कारण तो राजाशी आपले संबंध बिघडवू इच्छित नव्हता. दुसऱ्या मित्रानेही त्याला सोबत येण्याची तयारी दर्शविली पण अचानक कामाचे कारण सांगून येण्याची टाळाटाळ केली. त्या व्यक्तीने तिसऱ्या मित्राला विचारताक्षणी तो त्याच्यासोबत गेला आणि राजासमोर त्या व्यक्तीची बाजू मोठ्या धीराने व खंबीरपणे मांडली. राजाला पण ते कथन योग्य वाटल्याने त्याने त्या व्यक्तीला दोषमुक्त केले. ही कथा ऐकवून गुरुजींनी समजावले पहिला मित्र म्हणजे पैसा. ते परमप्रिय असते पण मृत्युनंतर काहीच कामी येत नाही. तर दुसरा मित्र म्हणजे कुटुंब. आपले आपले म्हणणारे शेवटी आपल्याला वेळेला उपयोगी पडत नाहीत. आणि तिसरा मित्र म्हणजे आपला धर्म, जो आपल्याला जिवंत असेपर्यंत साथ देतोच पण मृत्युनंतर ही तो एकमेव आपल्या सोबत असतो.

*तात्पर्य :-* 

*माणसाने आपल्या वर्तनातून आपल्या मनूष्य धर्माचे पालन केले पाहिजे, जे माणूसकीच्या दृष्टिने योग्य आहे.*

*मुख्याध्यापक :- पाताळेश्वर विद्यालय पाडळी, ता. सिन्नर* 

*सचिव:- बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्था सिन्नर,*सचिव :- प. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणे.*

*सौ . सविता देशमुख,   अपशिक्षिका पाताळेश्वर विद्यालय पाडळी ता. सिन्नर जि. नाशिक* 

*7972808064*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here