*परीपाठ/पंचाग/दिनविशेष*

0
सौ . सविता देशमुख उपशिक्षिका पाताळेश्वर विद्यालय पाडळी ता- सिन्नर_ *7972808064*

 

*दिनांक :~ 27 डिसेंबर 2022**वार ~ मंगळवार* 

*आजचे पंचाग* 

पौष. 27 डिसेंबर

तिथी : शु. पंचमी (मंगळ)   

नक्षत्र : धनिष्ठा,

योग :- वज्र

करण : बव

सूर्योदय : 06:59, सूर्यास्त : 05:52,

*सुविचार* 

*आजच्या जगात फक्त तुमचं नाणं खर असून चालत नाही, तुमच्याकडे ते वाजवून दाखवायची किमया असली पाहिजे._

*म्हणी व अर्थ* 

*खा‌ऊ जाणे तो पचवू जाणे._

*अर्थ:-*  _जो माणूस धमकी दारीने एखादी गोष्ट करतो,  तो त्याच्या परिणामांना सामोरे जाण्यास तयार असतो._

*दिनविशेष*     

*या वर्षातील 361 वा दिवस आहे.*

 *महत्त्वाच्या घटना* 

*१९११: कॉंग्रेस अधिवेशनात जन गण मन राष्ट्रगीत पहिल्यांदा गायले गेले._

*१९४५: २८ देशांनी एकत्रित जागतिक बँक (World Bank) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund) स्थापन केले._

*१९७५: बिहारमधील (हल्लीचे झारखंड) चासनाला येथे कोळशाच्या खाणीत अचानक पाणी शिरून झालेल्या दुर्घटनेत ३७२ कामगार ठार झाले._

*२००४: मॅग्नेटर एसजीआर १८०६-२० ला स्फोट झाल्यामुळे उत्सर्जित किरण पृथ्वीला पोहोचते._

*२००७: पाकिस्तानातील माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची गोळी मारून हत्या करण्यात आली._

*जन्मदिवस / जयंती*

*१८२२: रेबीज किंवा हैड्रोफोबिया रोगावर लस शोधणारें रसायनशास्त्रज्ञ लुई पाश्चर यांचा जन्म. (मृत्यू: २८ सप्टेंबर १८९५)_

*१८९८: विदर्भातील सामाजिक नेते, शिक्षण प्रसारक आणि केंद्रीय कृषिमंत्री पंजाबराव देशमुख यांचा जन्म. (मृत्यू: १० एप्रिल १९६५)._

*१९६५: हिंदी चित्रपट अभिनेता सलमान खान यांचा जन्म._

*१९८६: दोन वेळा वर्ल्ड आणि ऑलिम्पिक चॅम्पियन बनणारी जमैका ची धावपटू शैली एन फ्रेजर प्राईस यांचा जन्म._

*मृत्यू / पुण्यतिथी*

*१९००: ब्रिटीश स्थापत्यशास्त्री विल्यम जॉर्ज आर्मस्ट्रॉंग यांचे निधन._

*१९६५: मराठी साहित्यिक, ज्ञानोदयचे संपादक देवदत्त नारायण टिळक यांचे निधन._

*१९७२: कॅनडाचे १४ वे पंतप्रधान आणि नोबेल पारितोषिक विजेते लेस्टर बी. पिअर्सन यांचे निधन. (जन्म: २३ एप्रिल १८९७)_

*२००७: पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भूट्टो यांची हत्या. (जन्म: २१ जून १९५३)_

*२०१३: अभिनेता फारुख शेख यांचे निधन._

*सामान्य ज्ञान* 

*गिझा पिरॅमिड कुठल्या देशात आहेत?_  

*गिझा पिरॅमिड इजिप्त*

*लायोनेल मेस्सी हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?_ 

*आंतरराष्ट्रीय फुटबॉल* 

*अजिंठा वेरूळ लेण्या कुण्या जिल्ह्यात आहेत?_

*औरंगाबाद*

*BRICS या जागतिक संघटेनेचे संक्षिप्त रूप काय आहे?_

*ब्राझील, रशिया, भारत, चीन, साऊथ आफ्रिका*

*पृथ्वीतलावर सर्वप्रथम कोणता एकपेशीय जीव अस्तित्वात आला ?_ 

 *अमिबा* 

*बोधकथा* 

*मूर्खांचे निष्‍कर्ष*

_एका खगोलशास्त्रज्ञाने दुर्बिणीतून सूर्याचे निरीक्षण केले. त्‍याला निरीक्षणातून असे कळून आले की सूर्यावर प्रचंड मोठा प्राणी आहे व आपण खूप मोठा शोध लावला या समजूतीने तो लोकांना जमवून त्‍या शोधाची माहिती सांगू लागला की ” सूर्य प्रचंड उष्‍ण तारा असूनही त्‍यावर एक प्राणी जीवंत राहतो आणि तुम्‍ही सगळे आता घाबरून राहा जर तो प्राणी पृथ्‍वीवर आला तर पृथ्‍वीचे काय होईल हे पहा.” खगोलशास्‍त्रज्ञाच्‍या या बोलण्‍यावर काही लोकांचा खरेच विश्‍वास बसला व त्‍यांच्‍यापैकी काही लोकांनी त्‍याचा सत्‍कार करण्‍याचे ठरविले._

_पण जमलेल्‍या काही लोकांपैकी एक जण चिकित्‍सक होता त्‍याने त्‍या ज्‍योतिष्‍याची दुर्बिण तपासायचे ठरविले व त्‍याने ती दुर्बिण तपासली असता त्‍याच्‍या लक्षात आले की महाकाय प्राणी हा सूर्यावर नसून एक माशी दुर्बिणीच्‍या काचेवर अडकून पडली आहे आणि सूर्याकडे पाहताना ती माशी म्‍हणजे महाकाय प्राणी असल्‍याचा भास होत होता. चिकित्‍सक माणसाने ही गोष्‍ट लोकांना सांगताच त्‍यांना शास्‍त्रज्ञाचा मूर्खपणा लक्षात आला._

*तात्‍पर्य:- जे लोक मूर्खपणाने किंवा उतावीळपणे बेछूट विधाने करतात किंवा सारासार विचार न करता, पुढचामागचा विचार न करता बोलत राहतात असे लोक कधी ना कधी तोंडावर आपटतात. त्‍यांचा पराभव हा निश्चित ठरलेला असतो.*

*मुख्याध्यापक :- पाताळेश्वर विद्यालय पाडळी, ता. सिन्नर* *सचिव:- बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्था सिन्नर,*सचिव :- नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ नाशिक.* सौ . सविता देशमुख उपशिक्षिका पाताळेश्वर विद्यालय पाडळी ता- सिन्नर_ *7972808064*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here