*परीपाठ/पंचाग/दिनविशेष*

0
सौ . सविता देशमुख उपशिक्षिका पाताळेश्वर विद्यालय पाडळी ता- सिन्नर_ *7972808064*

*दिनांक :~ 28 डिसेंबर 2022* *वार ~ बुधवार* 

*आजचे पंचाग* 

*पौष. 28 डिसेंबर*

*तिथी : शु. षष्ठी (बुध)*   

*नक्षत्र : शततारका,*

*योग :- सिद्धी*

*करण : कौलव*

*सूर्योदय : 06:59, सूर्यास्त : 05:52,*

*सुविचार* 

आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन, हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल त्याला कसल्याही काळोखातून अचूक मार्ग दिसतो._

*म्हणी व अर्थ* 

गळा नाही सरी, सुखी निद्रा करी.

*अर्थ :-*_ज्या स्री च्या अंगावर दागिने नसतात, तिला सुखाने झोप लागते._ *दिनविशेष*    

*या वर्षातील 362 वा दिवस आहे.*

*महत्त्वाच्या घटना* 

*१८८५ : मुंबई येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची (Indian National Congress) स्थापना_

*१८४६ : आयोवा हे अमेरिकेचे (USA) २९ वे राज्य बनले._

*१८३६ : स्पेनने मेक्सिकोच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली._

*१६१२ : गॅलिलिओ गॅलिली याने प्रथमच नेपच्यून या ग्रहाचा शोध लावला. मात्र तेव्हा त्याला तो तारा आहे असे वाटले होते._

*जन्मदिवस / जयंती*

*१९५२ : अरुण जेटली केंद्रीय मंत्री व वकील

*१९४० : ए. के. अँटनी भारताचे परराष्ट्रमंत्री

*१९३७ : रतन टाटा – उद्योगपती

*१९३२ : धीरुभाई अंबानी – उद्योगपती (मृत्यू: ६ जुलै २००२)_

*१९२६ : हुतात्मा शिरीषकुमार (मृत्यू: १० ऑगस्ट १९४२)_ *१९११ : फणी मुजुमदार – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथा लेखक. दूरदर्शनवर लोकप्रिय झालेल्या ’रामायण’ या मालिकेची पटकथा त्यांनी लिहिली होती. चित्रपटसृष्टीतील सहा दशकांच्या वाटचालीत त्यांनी केवळ हिन्दीतच नव्हे तर चिनी, बंगाली, मल्याळी, उडिया व इंग्रजी चित्रपटांच्या निर्मितीत मोठे नाव कमावले. (मृत्यू: १६ मे १९९४)_

*१८९९ : गजानन त्र्यंबक तथा ग. त्र्यं. माडखोलकर – कादंबरीकार, समीक्षक आणि पत्रकार (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९७६)_

*१८५६ : वूड्रो विल्सन – अमेरिकेचे २८ वे राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: ३ फेब्रुवारी १९२४)_

*मृत्यू / पुण्यतिथी*

*२००६ : प्रभाकर पंडित – संगीतकार व व्हायोलिनवादक (जन्म: ३० सप्टेंबर १९३३)_

२००० : मेघश्याम पुंडलिक तथा मे. पुं. रेगे – तत्त्वचिंतक, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष (जन्म: २४ जानेवारी १९२४ – वेंगुर्ला)_

*१९८१ : हिन्दी चित्रपटांत चार दशके चरित्र अभिनेत्याच्या भूमिका करणारे डेविड अब्राहम चेऊलकर तथा डेविड यांचे कॅनडातील टोरांटो येथे निधन झाले. (जन्म: ? ? १९०९)_

*१९७७ : सुमित्रानंदन पंत – छायावादी विचारधारेतील हिन्दी कवी (जन्म: २० मे १९००)_

*१६६३ : फ्रॅन्सेस्को मारिया ग्रिमाल्डी – इटालियन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: २ एप्रिल १६१८)_

*सामान्य ज्ञान* 

*भारतात कोरोणा लसीकरणाची परवानगी मागणारी पहिली भारतीय कंपनी कोणती होती?_

*सिरम इन्स्टिट्यूट*

*भारतातील सर्वोच्च पुरस्कार कोणता?_

*भारतरत्न*

*नासा ही संस्था कोठे आहे?_

*वॉशिंग्टन*

*WHO चा फुल फॉर्म काय आहे?_

*World Health Organization जागतिक आरोग्य संघटना.*

भारतात नोट बंदी कोणत्या वर्षी झाली?_

*8 नोव्हेंबर 2016*

*बोधकथा*  *खोड मोडली*

तुकाराम नावाचा एक ‍मीठाचा व्यापारी होता. त्याच्याजवळ एक गाढव होते. ते फार आळशी होते. रोज सकाळी तुकाराम गाढवाच्या पाठीवर मीठाच्या पिशव्या लादत असे. मग तो गाढवाला घेऊन शेजारच्या गावात मीठ विकायला जात असे. जाताना एक ओढा लागत असे. एके दिवशी ओढा ओलांडत असताना गाढवाचा पाय अचानक घसरला व ते पाण्यात पडले. त्यामुळे त्याच्या पाठीवरचे मीठाचे पोते पाण्यात भिजले. त्यातील मीठ विरघळल्याने ते हलके झाले. त्यामुळे गाढवाचे ओझे कमी झाले. त्याला चांगलाच आराम मिळाला. दुसर्‍या दिवशी गाढवाने मुद्दाम पाण्यात पडल्याचे नाटक केले. मीठ पुन्हा पाण्यात भिजल्याने त्यादिवशीही गाढवाला आराम मिळाला. मग तो सारखेच असे करू लागला. पण लवकरच तुकारामला ही युक्ती लक्षात आली. त्याची खोड मोडण्यासाठी मग त्याने एके दिवशी त्याच्या पाठीवर कापसाचे ओझे ठेवले. ओढा लागताच गाढवाने पुन्हा पडल्याचे नाटक केले. मात्र, या वेळी पाटीवर मीठाऐवजी कापूस असल्याने तो भिजल्यावर चांगलाच जड झाला. त्यामुळे गाढवाला लवकर उठता येईना. त्याला त्या दिवशी अधिकच ओझे वाहावे लागले. त्याला चांगलीच अद्दल घडली. तेव्हापासून गाढवाने कधीच पाण्यात पडल्याचे नाटक केले नाही व कामचुकारपणा केला नाही.

*तात्‍पर्य:- कामातून पळवाट शोधणे केव्हाही वाईट.*

*मुख्याध्यापक :- पाताळेश्वर विद्यालय पाडळी, ता. सिन्नर* 

*सचिव:- बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्था सिन्नर, सचिव :- प. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणे.* सौ . सविता देशमुख उपशिक्षिका पाताळेश्वर विद्यालय पाडळी ता- सिन्नर जि नाशिक_ *7972808064*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here