दिनांक :~ 29 डिसेंबर 2022 , वार ~ गुरूवार
*आजचे पंचाग*
पौष. 29 डिसेंबर
तिथी : शु. सप्तमी (गुरु)
नक्षत्र : पु. भाद्रपदा,
योग :- व्यतिपात
करण : गर
सूर्योदय : 06:58, सूर्यास्त : 05:52,
*सुविचार*
स्वाभिमानाचा लिलाव करुन मोठं होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहणं,कधीही चांगलं …!_
*म्हणी व अर्थ*
उभ्याने यावे आणि ओणव्याने जावे.
अर्थ :- येते वेळी ताठ मानेने यावे आणि जाते वेळी खाली मान घालून जाणे.
*दिनविशेष*
या वर्षातील 363 वा दिवस आहे.
*महत्त्वाच्या घटना*
१९३०: सर मुहम्मद इकबाल यांनी दोन राष्ट्र सिद्धांत तसेच पाकिस्तानच्या निर्मितीचा दृष्टीकोन मांडला.
१९५९: नोबेल पारितोषिक विजेते रिचर्ड फाइनमॅन यांनी CALTECH येथे There is plenty of room at the bottom हे प्रसिद्ध भाषण दिले. ही nanotechnology ची सुरुवात मानली जाते.
१९५९: पोर्तुगालमधील लिस्बन येथे भुयारी रेल्वेची सुरूवात झाली.
१९८३: भारतीय क्रिकेटर सुनील गावस्कर यांनी वेस्ट इंडीस विरुद्ध २३६ रन बनविले, तेव्हा हा स्कोर कसोटी सामन्यामधील सर्वात जास्त होता.
२०१२: पाकिस्तान मध्ये पेशावर जवळ आतंकवादी हल्यात २१ सुरक्षाकर्मी मरण पावले.
जन्मदिवस / जयंती
१८००: रबरावरील व्हल्कनायझेशन ही प्रक्रिया शोधणारे अमेरिकन संशोधक चार्ल्स गुडईयर यांचा जन्म. (मृत्यू: १ जुलै १८६०)
१८४४: कॉंग्रेसचे पहिले अध्यक्ष व्योमकेशचंद्र बनर्जी यांचा जन्म.
१९००: मास्टर दिनानाथ मंगेशकर यांचा जन्म. (मृत्यू: २४ एप्रिल १९४२)
१९१७: निर्माते-दिगदर्शक रामानंद सागर यांचा जन्म. (मृत्यू: १२ डिसेंबर २००५)
१९४२: सुपरस्टार राजेश खन्ना यांचा जन्म. (मृत्यू: १८ जुलै २०१२)
१९६०: ओस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड बून यांचा जन्म.
१९७४: अभिनेत्री ट्विंकल खन्ना यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी
१९६७: गायक, पंडित ओंकारनाथ ठाकुर यांचे निधन. (जन्म: २४ जून १८९७)
१९७१: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी दादासाहेब गायकवाड यांचे निधन.
२०१३: भारतीय लेखक आणि अनुवादक जगदीश मोहंती यांचे निधन. (जन्म: १७ फेब्रुवारी १९५१)
२०१४: भारतीय-हाँगकाँगचे व्यापारी हरी हरिलेला यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १९२२)
*२०१५ : पंजाबचे २५ वे राज्यपाल ओमप्रकाश मल्होत्रा यांचे निधन. (जन्म: ६ ऑगस्ट १९२२)
*सामान्य ज्ञान*
*टेलिफोनचा शोध कोणी लावला?
ग्रॅहम बेल
*महाराष्ट्रतील कोणत्या ठिकाणी अणुवीज केंद्र आहे?
तारापूर
*कानिफनाथ महाराज समाधी स्थळ कोठे आहे?
मढी (अहमदनगर)
*बालिका दिवस हा कधी असतो?
३ जानेवारी
*भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे?
पुणे
*बोधकथा* सकारात्मक खोटे
एका शेतकऱ्याच्या पिकांचे खूप नुकसान झाले होते. त्याच्या घरात अन्नाचा कणही शिल्लक नव्हता. गावात त्याला मदत पण करीत नव्हते काय करावे म्हणून शेतकरी विचार करीत राहिला. काहीच उपाय सुचला नाही तेंव्हा त्याने गावातील सावकाराची गाय चोरली. सकाळी त्या गायीचे दुध आपल्या मुलांना पाजले व त्यांची भूक भागविली. सावकाराच्या नोकरांना गाय चोरल्याचे कळल्यावर त्यांनी चोरीची तक्रार केली. सावकाराने पंचायतीमध्ये शेतकऱ्याला बोलावले व विचारले,”हि गाय तू कुठून आणली आहे? ” शेतकरी म्हणाला,” हि गाय मी खरेदी केली आहे.” पंचानी कसून चौकशी केल्यावर सुद्धा शेतकरी त्याच उत्तरावर ठाम राहिला. त्यानंतर पंचानी सावकाराला विचारले, हि गाय खरेच आपली आहे का? सावकाराने क्षणभरच शेतकऱ्याकडे पाहिले आणि शेतकऱ्याने आपली नजर खाली झुकविली, सावकाराने पंचांना सांगितले,” हि गाय माझी नाही, माझ्याकडून गायीला ओळखण्यात चूक झाली आहे.” पंचानी शेतकऱ्याला दोषमुक्त केले. घरी पोहोचल्यावर सावकाराच्या नोकरांनी सावकाराला खोटे बोलण्याचे कारण विचारले तेंव्हा सावकार म्हणाला,” ती गाय आपली आहे हे मला व त्या शेतकऱ्याला दोघानाही माहित आहे. पण त्या क्षणी मला शेतकऱ्याचा डोळ्यात विवशता, भुकेची जाणीव आणि केलेल्या चोरीचा पश्चाताप असे एकत्रित भाव दिसले. मी त्याच्यावर आलेल्या संकटाचे गांभीर्य ओळखून खोटे बोललो. मी जर खरे बोललो असतो तर त्याला शिक्षा होवून त्याचे कुटुंब उघड्यावर आले असते त्यापेक्षा मी त्याला खोटे बोलून वाचविले.
तात्पर्य:- एखादा संकटात असेल तर त्याला वाचविण्यासाठी आपण प्रत्येक शक्य ते प्रयत्न करणे गरजेचे आहे.
मुख्याध्यापक :- पाताळेश्वर विद्यालय पाडळी, ता. सिन्नर
▪️सचिव:- बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्था सिन्नर, सचिव :- नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ नाशिक. सौ . सविता देशमुख :उपशिक्षिका पाताळेश्वर विद्यालय पाडळी ता- सिन्नर जि- नाशिक
7972808064