*परीपाठ/पंचाग/दिनविशेष* 

0
सौ . *सविता देशमुख उपशिक्षिका पाताळेश्वर विद्यालय पाडळी ता . सिन्नर* *7972808064*

 *दिनांक :~ 31 डिसेंबर 2022* वार ~ शनिवार 

*आजचे पंचाग* 

*पौष. 31 डिसेंबर*

*तिथी : शु. नवमी (शनि)*   

*नक्षत्र : रेवती,*

*योग :– परीघ*

*करण : तैतिल*

*सूर्योदय : 06:58, सूर्यास्त : 05:53,*

*सुविचार* 

“माघार” हा शब्द डोक्यातून काढल्याशिवाय विजयाची सवय  आपल्यला लागत नाही…!_

म्हणी व अर्थ

ऊन पाण्याने घर जळत नसते._ 

*अर्थ* :- 

*एखाद्यावर खोटे आरोप केल्याने त्याची बेअब्रू होत नाही._

*दिनविशेष*     

*या वर्षातील 365 वा दिवस आहे.*

महत्त्वाच्या घटना 

*१६००: ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीची स्थापना._

*१८०२: इंग्रज व दुसरा बाजीराव यांच्यात वसईचा तह झाला या तहात पेशव्यांचा बराच भूभाग इंग्रजांच्या अधिपत्याखाली गेला._

*१८७९: थॉमस एडिसनने मेन्लो पार्क, न्यू जर्सी येथे प्रथमच विद्युत दिव्यांचे प्रात्यक्षिक दाखवले._

*१९५५: जनरल मोटर्स वर्षातून 1 अब्ज अमेरिकन डॉलर्सची कमाई करणारी पहिली अमेरिकी कंपनी बनली._

*१९९९: पनामा कालव्यावर पनामा (देशा) चे पूर्ण नियंत्रण आले. त्याआधी काही वर्षे या कालव्यावर अमेरिका व पनामा यांचे संयुक्तपणे नियंत्रण होते._

*२००४: त्याकाळी जगात सर्वात उंच असलेल्या (१६७० फूट), तैपेइ – १०१ या इमारतीचे उद्‍घाटन झाले._

*जन्मदिवस / जयंती*

१८७१: आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव यांचा जन्म. (मृत्यू: २५ मे १९५४)

*१९१०: हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांचा जन्म. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९९२)_

*१९२५: भारतीय लेखक श्री लाल शुक्ला यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑक्टोबर २०११)_

१९३४: भारतीय लेखक, कवी आणि विद्वान अमीर मुहम्मद अकरम अववान यांचा जन्म._

मृत्यू / पुण्यतिथी

*१९२६: इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे निधन. (जन्म: १२ जुलै १८६३)_

*१९५३: के.एल.एम. चे संस्थापक अल्बर्ट पेलेस्मान यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १८८९)_

*१९८६: केंद्रीय आरोग्य मंत्री राजनारायण यांचे निधन._

*१९९३: जॉर्जियाचे पहिले अध्यक्ष झवेद गमझखुर्डिया यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च १९३९)_

*१९९७: स्वरराज छोटा गंधर्व यांचे निधन. (जन्म: १० मार्च १९१८)_

*सामान्य ज्ञान* 

*366 दिवस असणाऱ्या वर्षाला कोणते वर्ष म्हणून ओळखतात?_ 

*लीप वर्ष*

*छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कधी असते?_ 

*१९ फेब्रुवारी*

*ITI चे संक्षिप्त रूप काय आहे?

*Industrial Training Institute(इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्ुट)*

*प्रभू श्री रामचंद्र यांच्या वडिलांचे नाव काय होते?_ 

 राजा दशरथ

 *बालिका दिवस केव्हा असतो?* 

 3 जानेवारी_ 

 *बोधकथा* 

 *उंदीर, कोंबडा आणि मांजर* 

एक उंदराचे पिटुकले पिल्लु पाहिल्यांदा आपल्या बिळातून बाहेर पडले होते, ते थोडा वेळ इकडेतिकडे फिरून पुनः बिळात गेल्यावर आपल्या आईस म्हणते, ‘आई, ज्या या लहानशा जागेत तू मला लहानाचे मोठे केलेस, ती जागा सोडून आज मी अंमळ बाहेर जाऊन आले; तेथे मी जी मौज पाहिली, ती काही विलक्षणच. रस्त्याच्या बाजूने फिरत असता, मी दोन प्राणी पाहिले; त्यापैकी एक प्राणी फार गडबडया स्वरूपाचा असून त्याच्या डोक्यावर तांबडया रंगाचा तुरा होता. तो प्राणी जेव्हा जेव्हा आपली मान हलवी, तेव्हा तेव्हा तो तुराही हालत असे. मी त्याची ही मौज पहात होतो, इतक्यात त्याने आपले दोन्ही हात हलविले आणि असा काही कर्कश शब्द केला की, त्याने माझ्या कानठळ्याच बसून गेल्या. आता दुसर्‍या प्राण्याची गोष्ट ऐक. तो प्राणी फार सभ्य आणि शांत असून, त्याच्या अंगावर रेशमासारखी मऊ लोकर होती. तो चांगला देखणा असून, त्याचे एकंदर वर्तन असे होते की त्याच्याशी आपली मैत्री व्हावी असे मला वाटल्याशिवाय राहिले नाही.’ हे भाषण ऐकून उंदरी त्यास म्हणाली, ‘वेडया पोरा ! तुला काडीचीही अक्कल नाही. नुसत्या दिखाऊपणावर जाशील तर फसशील, हे लक्षात ठेव. तू जो प्राणी पाहिल्याने पाहिलास व ज्याचा शब्द ऐकून तुला इतके भय वाटले, तो विचारा कोंबडा अगदी निरुद्रची असून, एखादे वेळी त्याच्या मांसाचा थोड तरी भाग आपणास मिळण्याचा संभव आहे; पण रेशमासारख्या मऊ अंगाचा जो दुसरा प्राणी तू पाहिलास ते दुष्ट लबाड आणि क्रूर मांजर असून, उंदराच्या मांसाशिवाय दुसरा कोणताही पदार्थ त्याला फारसा आवडत नाही, हे लक्षात ठेव.’

*तात्पर्य:- बाह्य देखावा आणि सौंदर्य यांवरून माणसाच्या अंतरंगाची परीक्षा होणे शक्य नाही.*

 *श्री . देशमुख एस .बी.मुख्याध्यापक :- पाताळेश्वर विद्यालय पाडळी, ता. सिन्नर* 

*सचिव:- बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्था सिन्नर,* *सचिव :- प. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणे.*

सौ . *सविता देशमुख उपशिक्षिका पाताळेश्वर विद्यालय पाडळी ता . सिन्नर* 
*7972808064*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here