*❂ दिनांक :~ 03 जानेवारी 2023 ❂* वार ~ मंगळवार
*आजचे पंचाग*
*पौष. 03 जानेवारी*
*तिथी : शु. द्वादशी (मंगळ)*
*नक्षत्र : कृत्तिका,*
*योग :- शुभ*
*करण : बव*
*सूर्योदय : 06:57, सूर्यास्त : 05:52,*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*सुविचार *
*वादळे, समस्या आणि नशीब आपल्यापुढे झुकायला तयार असतात. फक्त आपलं ध्येय निश्चित आणि मानसिकता जिंकण्याची पाहिजे..!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*म्हणी व अर्थ *
*जशी देणावळ तशी धुणावळ.*
*अर्थ:- पैश्याप्रमाणे काम करणे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*दिनविशेष *
*जागतिक अॅक्युप्रेशर थेरपी दिन*
*मूलभूत कर्तव्यपालन दिन*
*या वर्षातील 03 वा दिवस आहे.*
*महत्त्वाच्या घटना*
*१४९६: लिओनार्डो दा विंची यांचा उड्डाणयंत्राचा प्रयोग अयशस्वी झाला.*
*१९४७: अमेरिकन संसदेच्या कामकाजाचे प्रथमच टेलिव्हिजन चित्रीकरण करण्यात आले.*
*९५०: पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (NCL) उद्घाटन झाले.*
*१९५२: स्वतंत्र भारतात पहिल्या राष्ट्रीय निवडणुका झाल्या.*
*१९५७: हॅमिल्टन इलेक्ट्रिक या कंपनीने जगातील पहिले बॅटरीवर चालणारे मनगटी घड्याळ विक्रीसाठी आणले.*
*२००४: नायगाव येथील सावित्रीबाई फुले यांचे जन्मघर राज्य संरक्षित स्मारक राष्ट्राला अर्पण केले.*
*जन्मदिवस / जयंती*
*१९३८: भारताचे माजी अर्थमंत्री मेजर जसवंत सिंग जासोल यांचा जन्म. (निधन: २७ सप्टेंबर २०२०)*
*१८३१ : पहिल्या स्त्री शिक्षिका आणि समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांचा जन्म. (मृत्यू: १० मार्च १८९७)*
*१८८३: इंग्लंडचे पंतप्रधान क्लेमंट अॅटली यांचा जन्म. (मृत्यू: ८ आक्टोबर १९६७)*
*१९२१: हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक चेतन आनंद यांचा जन्म. (मृत्यू: ६ जुलै१९९७)*
*१९३१: मराठी लेखक आणि इतिहास संशोधक डॉ. यशवंत दिनकर फडके यांचा जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी २००८)*
*मृत्यू / पुण्यतिथी*
*१९०३: अॅडॉल्फ हिटलरचे वडील अॅलॉइस हिटलर यांचे निधन. (जन्म: ७ जून १८३७)*
*१९७५: भारतीय रेल्वेमंत्री आणि राजकारणी ललित नारायण मिश्रा यांचे निधन. (जन्म: २ फेब्रुवारी १९२३)*
*१९९८: तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य प्रा. केशव विष्णू तथा बाबा बेलसरे यांचे निधन (जन्म: ८ फेब्रुवारी १९०९)*
*२०००: स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री सुशीला नायर यांचे निधन. (जन्म: २६ डिसेंबर १९१४)*
*२००२: इस्रोचे माजी अध्यक्ष आणि अंतराळ शास्रज्ञ सतीश धवन यांचे निधन. (जन्म: २५ सप्टेंबर १९२०)*
*२००५: भारतीय नेते जे. एन. दिक्षित यांचे निधन.*
*सामान्य ज्ञान*
*स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री कोण होते ?*
*पंडित जवाहरलाल नेहरू.*
*चीन या देशाची राजधानी कोणती आहे?*
*बीजिंग*
*जगातील विस्ताराने सर्वात लहान देश कोणता आहे?*
*व्हॅटिकन सिटी (युरोप)*
*भारतातील सर्वात जास्त जिल्ह्याचे राज्य कोणते आहे?*
*उत्तर प्रदेश*
*ज्ञानेश्वर महाराजांचे जन्म स्थान कोणते आहे?*
*आपेगाव*
*बोधकथा *
_गरुड आणि घुबड_
एक गरुड आणि एक घुबड, फार दिवस एकमेकांशी भांडत असत. शेवटी त्यांनी परस्परांशी मित्रत्वाने वागण्याची शपथ घेतली व एकमेकांच्या पिल्लांस खाऊ नये असे ठरविले. घुबड गरुडास म्हणाले, ‘गडया ! पण माझी पिल्ले कशी असतात, हे तुला ठाऊक आहे ना? ठाऊक नसेल, तर ती दुसऱ्या एखादया पक्ष्याची आहेत असे समजून तू त्यांना गट्ट करशील, अशी मला भीति वाटते,’ गरुड म्हणाला, ‘खरेच, तुझी पिल्ले कशी असतात, हे मला मुळीच ठाऊक नाही.’ घुबड म्हणाले, ‘ऐक तर. माझी पिल्ले फार सुंदर असतात. त्यांचे डोळे सुंदर, पिसे सुंदर, सगळेच काही सुंदर असते. या वर्णनावरून माझी पिल्ले कोणती हे तुला सहज समजेल.’ पुढे एके दिवशी, एका झाडाच्या ढोलीत, गरुडास घुबडाची पिल्ले सापडली. त्यांजकडे पाहून तो म्हणाला, ‘किती घाणेरडी, कंडाळवाणी आणि कुरूप पिल्ले ही ! आपली पिल्ले फार सुंदर असतात, म्हणून घुबडाने सांगितले आहे. तेव्हा, ही घुबडाची पिल्ले खास नव्हते. यास मारून खाण्यास काही हरकत नाही.’ असे म्हणून त्याने त्या पिलांचा फडशा उडविला ! आपली पिल्ले नाहीशी झालेली पाहून घुबड गरुडाला म्हणाले, ‘गडया ! माझी पिल्ले तूच मारून खाल्लीस, असे मला वाटते.’ गरुड म्हणाला, ‘मी खाल्ली खरी, पण तो माझा दोष नव्हे. तू आपल्या पिल्लाचे जे खोटेचे वर्णन केलेस, त्यामुळे ती मला ओळखिता आली नाहीत. इतकी कुरूप पिल्ले घुबडाची नसतील, दुसऱ्या एखादया पक्ष्याची असतील, असे समजून मी ती मारून खाल्ली, यात माझा काय अपराध आहे बरे?’*
*तात्पर्य – स्वतःसंबंधाची खरी हकीकत लपवून ठेवून, भलतीच हकीकत सांगणारा मनुष्य शेवटी आपणास संकटात पाडून घेतो.*
*श्री. देशमुख. एस. बी,**मुख्याध्यापक :- पाताळेश्वरr विद्यालय पाडळी, ता. सिन्नर**सचिव:- बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्था सिन्नर,*सचिव :- नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ नाशिक.*
सौ. सविता देशमुख, उपशिक्षिका *7972808064*