*❂ दिनांक :~ 13 जाने 2023 ❂**वार ~ शुक्रवार*
*आजचे पंचाग*
*पौष. 13 जानेवारी*
*तिथी : कृ. षष्ठी (शुक्र)*
*नक्षत्र : उ.फाल्गुनी,*
*योग :- शोभन*
*करण : विष्टी*
*सूर्योदय : 06:57, सूर्यास्त : 05:55,*
*सुविचार*
*”कर्म नावाचा देव समजला की ,नशीब नावाच्या भुताची भीती वाटत नाही”…..*
*म्हणी व अर्थ*
*कानात बुगडी,गावात फुगडी.*
*अर्थ:- आपले वैभव प्रदर्शित करणारी स्री.*
*दिनविशेष*
*या वर्षातील 13 वा दिवस आहे.*
*महत्त्वाच्या घटना*
*१६१०: गॅलिलियो यांनी गुरूचा चौथा उपग्रह कॅलीस्टोचा शोध लावला.*
*१८८९: नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेल्या शारदा नाटकाचा पहिला प्रयोग इंदूर येथे झाला.*
*१९१५: इटलीतील अवेझानो येथे भूकंप. २९८०० लोकांचे निधन.*
*१९६४: कोलकता येथे झालेल्या मुस्लिमविरोधी दंग्यात १०० जण ठार.*
*१९६७: पुण्यातील स.प. महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव श्री. चिंतामणराव देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला.*
*१९९६: पुणे-मुंबई दरम्यान शताब्दी एक्सप्रेस रेल्वेगाडी सुरु झाली.*
*२००७: के. जी. बालकृष्णन यांनी भारताचे ३७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.*
*जन्मदिवस / जयंती*
*१९१९: आंध्रप्रदेशचे ११वे मुख्यमंत्री एम. चेन्ना रेड्डी यांचा जन्म. (मृत्यू: २ डिसेंबर १९९६)*
*१९२६: हिंदी आणि बंगाली चित्रपट दिगदर्शक आणि निर्माते शक्ती सामंत यांचा जन्म. (मृत्यू: ९ एप्रिल २००९)*
*१९३८: प्रसिद्ध संतूरवादक व संगीतकार पं. शिवकुमार शर्मा यांचा जन्म.*
*१९४९: भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांचा जन्म.*
*१९८३: भारतीय चित्रपट अभिनेता इम्रान खान यांचा जन्म.*
*मृत्यू / पुण्यतिथी*
*१८३२: लॉर्डस या जगप्रसिद्ध क्रिकेट मैदानाचे संस्थापक थॉमस लॉर्ड यांचे निधन. (जन्म: २३ नोव्हेंबर १७५५)*
*१९७६: सुप्रसिद्ध तबलावादक अहमद जाँ. थिरकवा यांचे निधन.*
*१९८५: हिंदी चित्रपटातील चरित्र अभिनेता मदन पुरी यांचे निधन.*
*१९९७: उद्योजक व वेदाभ्यासक मल्हार सदाशिव तथा बाबूराव पारखे यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १९१२)*
*१९९८: संगीत दिगदर्शक आणि नृत्य दिगदर्शक शंभू सेन यांचे निधन.*
*२०११: ख्यातनाम अभिनेते प्रभाकर पणशीकर यांचे निधन. (जन्म: १४ मार्च १९३१)*
*२०१३: क्रिकेटपटू रुसी सुरती यांचे निधन. (जन्म: २५ मे १९३६)*
*सामान्य ज्ञान*
*सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?*
*महात्मा फुले*
*वसुंधरा या शब्दाला पर्यायी शब्द कोणता आहे?*
*पृथ्वी*
*लाल बहादूर शास्त्री हे भारताचे कितवे पंतप्रधान होते?*
*दुसरे पंतप्रधान*
*महाराष्ट्र राज्य विधी मंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते?*
*नागपूर*
*रामदास महाराज यांची समाधी स्थळ कोठे आहे?*
*सज्जनगड*
*बोधकथा*
*उशिरा येण्याची शिक्षा*
*महात्मा गांधी नियमांचे पालन अतिशय काटकोरपणे करत असत. ते प्रत्येक नियम मोठ्या विचारपूर्वक तयार करत असत. स्वतः ही काटेकारपणे पालन करीत. त्यांच्या आश्रमात जेवणासाठी हजर राहण्यासाठी दोन वेळा घंटा वाजवून सूचना देण्यात येत असे. जो दुसर्या घंटेनंतर येत असे त्याला दुसर्या पंक्तीत बाहेर उभे राहावे लागत असे. अगदी त्या पंक्तीत जागा रिकामी असली तरी ! गांधीजी त्यास उशिरा येण्याची गोड शिक्षा संबोधत असत. दुसर्या घंटेनंतर नियमाप्रमाणे भोजनगृहाचे दरवाजे बंद केले जात असत. मग कोणालाही आत प्रवेश नसे. एकदा स्वतः गांधीजींना उशीर झाला. दरवाजा बंद करणारे आश्रमवासी गांधीजींना येताना पाहून घुटमळले. तेवढ्यात महादेव भाईंनी त्यांना सांगितले, काय आपल्याला बापूजींकडून शिक्षा घ्यायचीय का ? लवकर दरवाजा बंद करा . नियमाप्रमाणे गांधीजीं व्हरांड्यात उभे राहिले. नियमांचे पालन होत आहे हे पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. त्याचवेळी तेथे हरिभाऊ उपाध्याय आले व बापूजींना उभे पाहून म्हणाले, बापूजी, आज आपणही गुन्हेगारांच्या रांगेत आलात ? जेवणास उशिरा आल्यामुळे ही गोड शिक्षा तुम्हालाही भोगावी लागत आहे.*
*तात्पर्य*जे नियम इतर सामान्यांना असतात, त्याला कधीतरी आपण सामोरे गेलो तर वाईट वाटून न घेता त्याला सामोरे जाणे केव्हाही चांगले.*
*एस बी देशमुख *मुख्याध्यापक :- पाताळेश्वर विद्यालय पाडळी, ता. सिन्नर*
*सचिव:- बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्था सिन्नर,*सचिव :- प. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणे.*
*सौ . सविता देशमुख : उपशिक्षिका, पाताळेश्वर विद्यालय पाडळी ता: सिन्नर 7972808064* |