*परीपाठ/पंचाग/दिनविशेष* 

0
सौ . सविता देशमुख : उपशिक्षिका ,पाताळेश्वर विद्यालय पाडळी ता . सिन्नर *7972808064*

*❂ दिनांक :~ 16 जाने 2023 ❂**वार ~ सोमवार* 

*आजचे पंचाग* 

*पौष. 16 जानेवारी*

*तिथी : कृ. नवमी (सोम)*   

*नक्षत्र : स्वाती,*

*योग :- धृती*

*करण : तैतिल*

*सूर्योदय : 06:56, सूर्यास्त : 05:56,*

*सुविचार* 

*पश्चात्ताप करून भूतकाळ बदलत नाही.*

*काळजी करून भविष्य घडवू शकत नाही.*

*त्यामुळे वर्तमानाचा आनंद घ्या.*

*हाच जीवनाचा सार आहे….*

*म्हणी व अर्थ* 

*गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली.*

*अर्थ :- एखादे काम सिद्धीस गेले तर ठीक नाही तरी नुकसान नाही.*

*दिनविशेष*    

*या वर्षातील 16 वा दिवस आहे.*

*महत्त्वाच्या घटना* 

*१६६०: रुस्तुम झमान आणि फाजल खान हे आदिलशहाचे सेनापती शिवाजी महाराजांवर चालुन आले आणि पराभूत होऊन परत गेले.*

*१६६६: नेताजी पालकर वेळेवर न आल्याने पन्हाळगड जिंकण्याचा शिवाजीराजांचा डाव फसला*

*१६८१: छत्रपती संभाजी राजे यांचा ’छत्रपती’ म्हणून राज्याभिषेक झाला.*

*१९०५: लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली, तेव्हा वायभंगाच्या चळवळीत देशभक्तानी वंदे मातरम् चा जल्लोष केला.*

*१९७८: रु. १,००० आणि अधिक किमतीच्या नोटा चलनातून रद्द*

*१९९६: पुण्याचे शिल्पकार दिनकर शंकरराव थोपटे यांची ललित कला अकादमीच्या पुरस्कारासाठी निवड*

*१९९८: ऊर्दू लेखक व कवी अली सरदार जाफरी यांना ’ज्ञानपीठ पुरस्कार’ जाहीर*

*२००८: टाटा मोटर्सच्या नॅनो या एक लाख रुपये किंमतीच्या ‘पीपल्स कार’चे अनावरण*

*जन्मदिवस / जयंती*

*१६३०: शिखांचे सातवे गुरु गुरु गुरु हर राय यांचा जन्म.*

*१८५३: आंद्रे मिचेलिन – फ्रेन्च उद्योगपती (मृत्यू: ४ एप्रिल १९३१)*

*१९२०: नानाभॉय अर्देशीर ऊर्फ ’नानी’ पालखीवाला – कायदेपंडित आणि अर्थतज्ञ (मृत्यू: ११ डिसेंबर २००२)*

*१९२६: ओंकार प्रसाद तथा ओ. पी. नय्यर – संगीतकार (मृत्यू: २८ जानेवारी २००७)*

*१९२७: भारतीय चित्रपट अभिनेत्री कामिनी कौशल यांचा जन्म.*

*१९४६: कबीर बेदी – चित्रपट अभिनेते*

*मृत्यू / पुण्यतिथी*

*१९०१: न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे – समाजसुधारक, धर्मसुधारक, अर्थशास्त्रज्ञ व न्यायाधीश (जन्म: १८ जानेवारी १८४२)*

*१९३८: शरदचंद्र चट्टोपाध्याय – बंगाली साहित्यिक, त्यांच्या ‘पथेर दाबी’ या कादंबरीतील क्रांतिकारक विचारांनी ब्रिटिश राज्यकर्त्यांतही खळबळ उडवून दिली होती. पु.बा. कुलकर्णी यांनी त्या कादंबरीचे ’भारती’ या नावाने मराठीत भाषांतर केले आहे. (जन्म: १५ सप्टेंबर १८७६)*

*१९८८: डॉ. लक्ष्मीकांत झा – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ, मुत्सद्दी, कुशल प्रशासक, रिझर्व बँकेचे गव्हर्नर, जम्मू काश्मीरचे राज्यपाल व भारताचे अमेरिकेतील राजदूत (जन्म: २२ नोव्हेंबर १९१३ – भागलपूर, बिहार)*

*१९९७: कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांची गोळ्या घालून हत्या (जन्म: ? ? १९३३)*

*२०००: त्रिलोकीनाथ कौल – मुरब्बी मुत्सद्दी, परराष्ट्र सचिव, रशिया, अमेरिका व इराणमधील भारताचे राजदूत (जन्म: ? ? १९१३ – बारामुल्ला, जम्मू काश्मीर)*

*२००५: श्रीकृष्ण हरी मेहेंदळे – संगीतकार, ’पेटीवाले’ मेहेंदळे (जन्म: ? ? ????)*

*सामान्य ज्ञान* 

*स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय होते?* 

*नरेंद्र*

*दृकश्राव्य साधनात अत्यंत प्रभावी साधन म्हणून कशाचा उपयोग होतो?* 

*दूरदर्शन*

* गणित शास्त्राचा पाया कोणता आहे?* 

*अंकगणित*

*फुटबॉल या खेळात एकूण खेळाडूंची संख्या किती असते.?* 

*११*

*भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून कोणाला ओळखले जाते?*

*प्रतिभाताई पाटील*

*बोधकथा* 

*मनाची एकाग्रता*  

*पांडुरंग ‘ मनाची एकाग्रता कशी करावी ‘ या विषयाचा अभ्यास करत बसला होता. त्याला जो कोणी भेटावयास येई, त्याच्याकडे तो दुर्लक्ष करायचा. आपल्याच चिंतनात मग्न असायचा. एकदा त्याचे गुरु सहदेव महाराज त्याच्याकडे आले. पाहतात तर पांडुरंग शून्यात नजर लावून बसलेला ! पांडुरंगाचे आपल्या गुरुकडे लक्षही नव्हते. सहदेव महाराज मात्र न रागावता तेथेच थांबले. त्यांनी एक वीट आणली आणि दिवसभर ती वीट एका दगडावर घासत बसले. शेवटी न राहवून पांडुरंगाने महाराजांना विचारले, ” महाराज आपण हे काय करता आहात ?” सहदेव म्हणाले, ” मला या विटेचा आरसा बनवायचा आहे.” पांडुरंग म्हणाला, ” महाराज, या विटेला घासून कधी आरसा होईल का ? जीवनभर घासत बसले तरीही विटेचा आरसा होणार नाही.” ते ऐकून सहदेव हसले. म्हणाले, ” मग तू तरी काय करत आहेस ? वीट जर आरसा होत नसेल, तर मनाचे तरी काय ?* 

*तात्पर्य :- मनावरील धूळ जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत साधना करुन तरी काय उपयोग ?*

*एस बी देशमुख , मुख्याध्यापक :- पाताळेश्वर विद्यालय पाडळी, ता. सिन्नर* 

*सचिव:- बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्था सिन्नर,*सचिव :- प. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणे.*

सौ . सविता देशमुख : उपशिक्षिका पाताळेश्वर विद्यालय पाडळी , सिन्नर 7972808064

ReplyForward

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here