*परीपाठ/पंचाग/दिनविशेष*

0
सौ . सविता देशमुख उपशिक्षिका पाताळेश्वर विद्यालय पाडळी सिन्नर_ *7972808064*

❂ दिनांक :~ 19 जाने 2023 ❂ वार ~ गुरूवार

*आजचे पंचाग* 

*पौष. 19 जानेवारी
*तिथी : कृ. द्वादशी (गुरू)
*नक्षत्र : ज्येष्ठा,
*योग :- ध्रुव
*करण : गर
*सूर्योदय : 06:55, सूर्यास्त : 05:55,

*सुविचार* 

*चालताना अशा व्यक्तींबरोबर चालावे की, ज्यांच्याबरोबर चालताना जीवनातील वेडी वाकडी वळणे सुद्धा सरळ होतील.

* म्हणी व अर्थ* 

उथळ पाण्याला खळखळाट फार.

*अर्थ:- ज्याच्या अंगी गुण थोडा, तो फार बढाई मारतो.

*दिनविशेष*     

*या वर्षातील 19 वा दिवस आहे.

*महत्त्वाच्या घटना* 

*१८३९: ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने एडनचा ताबा घेतला.
*१९४९: पुणे नगरपालिका व उपनगरपालिका विसर्जित होऊन पुणे महानगरपालिका स्थापन झाली.
*१९६८: पहिली यशस्वी ह्रुदयरोपण शस्त्रक्रिया डॉ. ख्रिस्तोफर बर्नाड यांनी केली.
*१९८६: (c)brain नावाचा कॉम्प्युटरचा पहिला व्हायरस पसरण्यास सुरूवात झाली.
*१९९६: प्रसिध्द मल्याळी लेखक एम. टी. वासुदेवन नायर यांची १९९५ च्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड.
*२००७: सरदार सरोवर धरणाचा वीजनिर्मिती प्रकल्प देशाला अर्पण करण्यात आला.

*जन्मदिवस / जयंती*

*१९३५: भारतीय (बंगाली) दिग्दर्शक, अभिनेते, आणि पदमभूषण पुरस्कार विजेते सौमित्र चट्टोपाध्याय यांचा जन्म. (निधन: १५ नोव्हेंबर २०२०)
*१७३६: वाफेच्या इंजिनाचा शोध लावणारे स्कॉटिश शास्रज्ञ आणि संशोधक जेम्स वॅट यांचा जन्म.
*१८९८: मराठी लेखक, कादंबरीकार, लघुनिबंधकार व समीक्षक विष्णू सखाराम तथा वि. स. खांडेकर यांचा जन्म. (मृत्यू: २ सप्टेंबर १९७६)
*१९०६: चित्रपट दिगदर्शक, अभिनेते आणि निर्माते विनायक दामोदर कर्नाटकी उर्फ मास्टर विनायक यांचा जन्म.
*१९३६: बांगलादेशचे ७ वे राष्ट्राध्यक्ष झिया उर रहमान यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे १९८१)

*मृत्यू / पुण्यतिथी*

*१९०५: भारतीय तत्त्वज्ञानी देबेन्द्रनाथ टागोर यांचे निधन.
*१९६०: मराठी चित्रपटाचे आद्य प्रवर्तक दादासाहेब तोरणे यांचे निधन. (जन्म: १३ एप्रिल १८९०)
*१९९०: भारतीय तत्त्वज्ञानी आचार्य रजनीश यांचे निधन. (जन्म: ११ डिसेंबर १९३१)
*२०००: उद्योगपती व क्रिकेट प्रशासक मुथ्थय्या अन्नामलाई तथा एम. ए. चिदंबरम यांचे निधन. (जन्म: १२ ऑक्टोबर १९१८)

*सामान्य ज्ञान* 

*मायकल जॅक्सन ही व्यक्ती कोणत्या क्षेत्राशी संबंधित होती?
*डान्सर

*कावीळ झालेल्या व्यक्तीचा रंग कसा दिसतो?
*पिवळसर

*कांदा या वनस्पती ला इंग्रजी नाव काय आहे?
*ऑनियन

*भगवान शंकर यांच्या दोन मुलांचे नाव काय आहे?
*गणेश, कार्तिकेय

*महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे?
*नागपूर

🕸 बोधकथा 🕸

एकीचे बळ मोठे असते.

एका जातक कथेतील वर्णनानुसार वाराणसीलगत एका गावातील एक सुतार रोज जंगलात जात असे. एकदा त्याने खड्डय़ात पडलेल्या जंगली कुत्र्याच्या पिल्याचा जीव वाचवला तेव्हापासून त्याला त्या पिलाचा लळा लागला. ते पिलू त्याला तेथे भेटत होते. ते पाहून इतरही जंगली कुत्रे त्याच्याजवळ येत असत. परंतु त्यांना सर्वाना एका वाघाने फार त्रस्त करून सोडले होते. तो रोज त्यांच्यावर हल्ले करत होता. सुताराने एक योजना बनविली. नेहमीप्रमाणे वाघ डोंगराच्या माथ्यावर आला. सर्व कुत्री वेगवेगळ्या ठिकाणी थांबून त्याच्यावर भुंकू लागली. वाघाने चवताळून एका कुत्र्यावर झेप घेतली तसा तो कुत्रा खाली बसला. वाघाची उडी थेट त्या कुत्र्याच्या मागे असणार्‍या एका मोठय़ा खड्डय़ात पडली. सगळ्या कुत्र्यांनी त्याच्यावर धाव घेतली व त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केले.

तात्पर्य : एकीचे बळ मोठे असते.

एस बी देशमुख ,मुख्याध्यापक :- पाताळेश्वर विद्यालय पाडळी, ता. सिन्नर
▪️सचिव:- बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्था सिन्नर, ▪️सचिव :- प. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणे.

सौ . सविता देशमुख उपशिक्षिका पाताळेश्वर विद्यालय पाडळी
7972808064

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here