*परीपाठ/पंचाग/दिनविशेष*

0
*सौ . सविता देशमुख, उपशिक्षिका पाताळेश्वर विद्यालय पाडळी ता सिन्नर_ *7972808064*

 *❂ दिनांक :~ 21 जाने 2023 ❂**वार ~ शनिवार* 

*आजचे पंचाग* 

*पौष. 21 जानेवारी*

*तिथी : कृ. अमावस्या (शनि)*   

*नक्षत्र : पुर्वाशाढा,*

*योग :- हर्षण*

*करण : चतुष्पाद*

*सूर्योदय : 06:55, सूर्यास्त : 05:54,*

*सुविचार* 

*”जेव्हा माणसाची योग्यता व हेतूचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो ,तेव्हा त्याचे शत्रूदेखील त्याचा सन्मान करू लागतात.*

*म्हणी व अर्थ* 

*जनात बुवा आणि मनात कावा.*

*अर्थ:- बाह्य जगात सज्जन पण मनात कपट.*

*दिनविशेष*     

*या वर्षातील 21 वा दिवस आहे.*

*महत्त्वाच्या घटना* 

*१७६१: थोरले माधवराव पेशवे यांनी वयाच्या १६ व्या वर्षी पेशवाईची सूत्रे हाती घेतली.*

*१७९३: राजद्रोहाच्या गुन्ह्यात दोषी आढळल्याबद्दल फ्रान्सचा राजा १६ वा लुई याचा गिलोटिनवर वध करण्य़ात आला.*

*१९६१: इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि त्यांचे पती ड्यूक ऑफ एडिंबरो यांची पहिली भारतभेट.*

*१९७२: मणिपूर आणि मेघालय या राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.*

*२०००: फायर अँड फरगे या रणगाडाविरोधी अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणेची भारताने यशस्वी चाचणी घेतली.*

*जन्मदिवस / जयंती*

*१८८२: कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक वामन मल्हार जोशी यांचा जन्म. (मृत्यू: २० जुलै १९४३)*

*१८९४: कवी, कोशकार, छंदशास्त्राचे व्यासंगी आणि मराठी भाषाशुद्धीचे तत्त्वनिष्ठ पुरस्कर्ते माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ माधव जूलियन यांचा जन्म. (मृत्यू: २९ नोव्हेंबर १९३९)*

*१९१०: गीतकार, लेखक आणि दिगदर्शक शांताराम आठवले यांचा जन्म. (मृत्यू: २ मे १९७५)*

*१९५३: मायक्रोसॉफ्टचे एक संस्थापक पॉल अ‍ॅलन यांचा जन्म.*

*१९८६: भारतीय सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते सुशांतसिंग राजपूत यांचा जन्म. (मृत्यू: १४ जून २०२०)*

*मृत्यू / पुण्यतिथी*

*१७९३: फ्रान्सचा राजा लुई (सोळावा) यांचे निधन. (जन्म: २३ ऑगस्ट १७५४)*

*१९२४: रशियन क्रांतिकारक व्लादिमिर लेनिन यांचे निधन. (जन्म: २२ एप्रिल १८७०)*

*१९४५: क्रांतिकारक रासबिहारी बोस यांचे टोकियो जपान येथे निधन. (जन्म: २५ मे १८८६)*

*१९५०: इंग्लिश कादंबरीकार व पत्रकार एरिक ब्लेअर ऊर्फ जॉर्ज ऑर्वेल यांचे निधन. (जन्म: २५ जून १९०३)*

*१९५९: दिगदर्शक, पटकथा लेखक आणि निर्माते सेसिल बी. डी. मिल यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १८८१)*

*१९९८: भारताचे ९ वे नौदल प्रमुख सुरेन्द्रनाथ कोहली यांचे निधन. (जन्म: २१ जून १९१६)*

*सामान्य ज्ञान* 

*पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना काय म्हणून ओळखतात?* 

*जलचर प्राणी*

*जमीन भुसभुशीत करणारा शेतकऱ्यांचा मित्र कोणाला म्हणतात?* 

*गांडूळ*

*महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणते* 

*मुंबई*

*वनस्पती आपले अन्न पानामध्ये कोणत्या रुपात साठवून ठेवतात?* 

*हरितद्रव्य*

*महाभारतातील द्रोणाचार्य यांच्या मुलाचे नाव काय होते?* 

*अश्वत्थामा*

*बोधकथा* 

*उपकार स्मरण करणे हेच माणसाचे कर्तव्य आहे !* 

*एकदा एक श्रीमंत माणूस नदीकाठावरील मारूती मंदिरात देवदर्शनासाठी गेला. अचानक त्याच्या मनात आले, नदीत जाऊन हात-पाय धुवावेत व मग मंदिरात देवदर्शनासाठी जावे. तो नदीवर गेला. हात-पाय धूत असताना त्याच्या तोल गेला आणि तो नदीत पडला. त्याला पोहता येत नव्हते. त्याची धडपड सुरू झाली. तो ओरडू लागला पण त्याला वाचविण्यासाठी कुणीही पुढे येईना.  अखेर एका साधूने नदीत उडी घेतली. त्या साधूने त्याला वाचविले. काठावर आणले. काही वेळाने तो श्रीमंत गृहस्थ भानावर आला. त्यानेखिशातून खूप नोटा बाहेर काढल्या. पण त्यातील फक्त एक रूपयाची नोट साधूच्या हातावर ठेवली. हे पाहून काठावर जमलेले लोक संतापले. चिडून त्यांना थांबविले. त्यांनी त्या व्यापार्‍याला उचलले व नदीत टाकणार इतक्यात साधूने त्यांना थांबविले. साधू म्हणाला, ‘थांबा, त्यांने स्वत:च किंमतीएवढीच बक्षिसी दिली. यात त्याची का चूक? त्याची किंमत एवढीच आहे.’*.  

*तात्पर्य – माणसाची खरी किंमत प्रसंगानेच कळते. उपकारकर्त्याचे उपकार स्मरणे हे माणसाचे पवित्र कर्तव्य आहे.*

*एस बी देशमुख मुख्याध्यापक :- पाताळेश्वर विद्यालय पाडळी, ता. सिन्नर*  *सचिव:- बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्था सिन्नर,*सचिव :- प. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणे.*

*सौ . सविता देशमुख, उपशिक्षिका पाताळेश्वर विद्यालय पाडळी ता सिन्नर_ *7972808064*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here