परीपाठ/पंचाग/दिनविशेष  

0
सविता देशमुख उपशिक्षिका पाताळेश्वर विद्यालय पाडळी, ता. सिन्नर

*❂ दिनांक :~ 25 जाने 2023 ❂** वार ~ बुधवार *

* आजचे पंचाग *

    ━═•●◆❃★❂★❃◆●•═━

*माघ. 25 जानेवारी*

*तिथी : शु. चतुर्थी (बुध)*   

*नक्षत्र : पू. भाद्रपदा,*

*योग :- परीघ*

*करण : बव*

*सूर्योदय : 06:53, सूर्यास्त : 05:54,*

 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*सुविचार *

*पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात.*

 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*म्हणी व अर्थ *

*आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे.*

*अर्थ :- अपेक्षेपेक्षा जास्त लाभ होणे.*

 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*दिनविशेष *    

*या वर्षातील 25 वा दिवस आहे.*

* महत्त्वाच्या घटना *

*१७५५: मॉस्को विद्यापीठाची स्थापना झाली.*

*१८८१: थॉमस अल्वा एडिसन आणि अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी ओरिएंटल टेलिफोन कंपनीची स्थापना केली.*

*१९७१: हिमाचल प्रदेशला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला व ते भारताचे १८ वे राज्य बनले.*

*१९९५: अमेरिकेने धृवीय प्रकाशाची (Aurora Borealis) माहिती घेण्यासाठी एक क्षेपणास्त्र सोडले.*

*२००१: स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईनवाझ बिस्मिल्ला खाँ यांना भारतरत्‍न प्रदान.*

*जन्मदिवस / जयंती*

*१६२७: आयरिश रसायनशास्त्रज्ञ रॉबर्ट बॉईल यांचा जन्म. (मृत्यू: ३० डिसेंबर १६९१)*

*१७३६: इटालियन गणितज्ञ जोसेफ लाग्रांगे यांचा जन्म. (मृत्यू: १० एप्रिल १८१३)*

*१८६२: सेवा सदन च्या संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या रमाबाई रानडे यांचा जन्म.*

*१८७४: इंग्लिश लेखक आणि नाटकाकर डब्ल्यू. सॉमरसेट मॉम यांचा जन्म. (मृत्यू: १६ डिसेंबर १९६५)*

*१८८२: ब्रिटिश लेखिका व्हर्जिनिया वूल्फ यांचा जन्म. (मृत्यू: २८ मार्च १९४१)*

*१९३८: नाटककार व समीक्षक सुरेश खरे यांचा जन्म.*

*१९५८: पार्श्वगायिका कविता कृष्णमूर्ती यांचा जन्म.*

*मृत्यू / पुण्यतिथी*

*१६६५: सोनोपंत डबीर यांचे निधन.*

*१९८०: सोलापूरचे दाते पंचांग कर्ते लक्ष्मणशास्त्री दाते यांचे निधन.*

*१९९६: रंगभूमी व चित्रपट अभिनेते प्रशांत सुभेदार यांचे निधन.*

*२००१: भारतीय जनता पक्षाच्या नेत्या विजयाराजे शिंदे यांचे निधन.*

*२०१५: ज्येष्ठ समीक्षक मधुकर दत्तात्रय तथा म. द. हातकणंगलेकर यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी १९२७ – हातकणंगले)*

 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*सामान्य ज्ञान *

*DD चे संक्षिप्त रूप काय आहे?* 

*दूरदर्शन / डिमांड ड्राफ्ट*

*पंढरपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे?* 

*चंद्र भागा ( भीमा )*

*ओझोन वायूचा रंग कोणता आहे?* 

*फिक्कट निळा*

*मायक्रोसॉफ्ट ( Microsoft ) या शब्दातील इंग्रजी पाचवे वर्ण कोणते?* 

*O वर्ण*

*भारताचे प्रवेशद्वार असलेला जिल्हा कोणता आहे?* 

*मुंबई*

 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

* बोधकथा *

*बढाई नको रे बाबा*

*एक माणूस फार वर्षे प्रवास करून आपल्या घरी आला व आपण परदेशात असताना काय मौजा पाहिल्या हे त्याने आपल्या शेजार्‍यापाजार्‍यांना तिखट मीठ लावून सांगितले. आणि अगदी शेवटी एक थाप ठोकून दिली की, ‘मी अलकावतीला गेलो असता तेथील लोक पंधरा पंधरा हात उंच उड्या मारतात पण त्यांनी माझ्याशी पैज लावली असता माझ्याइतकी उंच उडी एकालाही मारता आली नाही.’ ऐकणार्‍या कोणालाही ही गोष्ट खरी वाटली नाही. तेव्हा त्यांची खात्री करण्यासाठी तो नाना प्रकारच्या शपथा घेऊन लागला. त्या वेळी त्या लोकातील एक माणूस त्याला म्हणाला, ‘अहो, अशा शपथा कशाला घेता. हातच्या कंकणाला आरसा कशाला ? या वेळी तुम्ही अलकावतीला आहात असं समजून तिथे जशी उडी मारली तशी इथंही मारून दाखवा म्हणजे झालं.’ हे ऐकताच त्या बढाईखोर माणसाचे तोंड ताबडतोब बंद झाले.*

*तात्पर्य :- आपण प्रवासात पाहिलेल्या गोष्टी फुगवून सांगण्याची काही लोकांना सवय असते, पण एखादेवेळी त्यांचेच बोलणे त्यांच्या गळ्यात येऊन त्यांची फजिती झाल्याशिवाय राहात नाही.*

  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*श्री. देशमुख. एस. बी,मुख्याध्यापक :- पाताळेश्वर विद्यालय पाडळी, ता. सिन्नर* ** *सचिव**नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ*

*सचिव:- बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्था सिन्नर,**सचिव :- प. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणे.**7972808064* सविता देशमुख उपशिक्षिका पाताळेश्वर विद्यालय पाडळी, ता. सिन्नर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here