*परीपाठ/पंचाग/दिनविशेष*

0
सौ सविता देशमुख उपशिक्षिका पाताळेश्वर विद्यालय पाडळी

*❂ दिनांक:~ 24 फेब्रुवारी 2023 ❂** वार ~ शुक्रवार *

*आजचे पंचाग *

    ━═•●◆❃★❂★❃◆●•═━

*फाल्गुन. 24 फेब्रुवारी*

*तिथी : शु. पंचमी (शुक्र)*   

*नक्षत्र : अश्विनी,*

*योग :- शुक्ल*

*करण : बव*

*सूर्योदय : 06:52, सूर्यास्त : 05:57,*

 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

* सुविचार *

     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

*देशात राजा समाजात गुरू परिवारात पिता घरात स्त्री आणि जीवनात मित्र हे कधीच साधारण नसतात कारण निर्माण आणि प्रलय यांच्या च हातात असतात*

 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*म्हणी व अर्थ *

*कानात बुगडी, गावात फुगडी.*

*अर्थ -*

*आपले वैभव प्रदर्शित करणारी स्री.*

 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

* दिनविशेष *    

*या वर्षातील 55 वा दिवस आहे.*

*केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस*

*📚  महत्त्वाच्या घटना  📚*

*१८२२: जगातील पहिल्या स्वामीनारायण मंदिराचे अहमदाबाद येथे उद्‍घाटन झाले.*

*१९२०: नाझी पार्टीची स्थापना झाली.*

*१९६१: मद्रास राज्याचे नाव बदलून तामिळनाडू असे करण्याचा सरकारने निर्णय घेतला.*

*२०१०: एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात द्विशतक करणारा सचिन तेंडुलकर हा पहिला खेळाडू बनला.*

*🌹 जन्मदिवस / जयंती 🌹*

*१६७०: मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती राजाराम, शिवाजी महाराजांचे चिरंजीव यांचा जन्म. (मृत्यू: २ मार्च १७००)*

*१९२४: पार्श्वगायक व अभिनेता, गझलचे बादशहा तलत महमूद यांचा जन्म. (मृत्यू: ९ मे १९९८ – मुंबई, महाराष्ट्र)*

*१९४८: राजकारणी आणि दक्षिणेतील अभिनेत्री जे. जयललिता यांचा जन्म. (मृत्यू: ५ डिसेंबर २०१६)*

*१९५५: अ‍ॅपल कॉम्प्युटर्सचा सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑक्टोबर २०११)* *💐 मृत्यू / पुण्यतिथी💐*

*१६७४: कोल्हापूरजवळील नेसरीच्या खिंडीत बहलोलखानाच्या फौजेवर हल्ला करताना सेनापती प्रतापराव गुजर व त्यांचे ६ सहकारी मारले गेले. या प्रेरणादायी घटनेवरच कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी वेडात मराठे वीर दौडले सात हे काव्य लिहिले आहे.*

*१८१०: हायड्रोजन आणि आरगोन वायूंचा शोध लावणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ हेन्‍री कॅव्हँडिश यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १७३१)*

*१८१५: अमेरिकन अभियंते व संशोधक रॉबर्ट फुल्टन यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १७६५ – लिटिल ब्रिटन, पेनसिल्व्हानिया, यू. एस. ए.)*

*१९३६: मराठी साहित्यिक लक्ष्मीबाई टिळक यांचे निधन.*

*१९९८: अभिनेत्री व चित्रपट निर्मात्या ललिता पवार यांचे निधन. (जन्म: १८ एप्रिल १९१६)*

*२०११: अमर चित्र कथाचे जनक अनंत पै ऊर्फ अंकल पै यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर १९२९)*

 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*सामान्य ज्ञान *

     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

*वनस्पती आपले अन्न पानांमध्ये जमा करतात त्या अन्नाला काय म्हणतात?*

*हरितद्रव्य*

*संगणकीय भाषेत MB म्हणजे काय?*

* मेगा बाईट*

*बेल हे कोणत्या भगवंताचे प्रिय वृक्ष आहे?*

*शंकर भगवान*

*कोळी या किड्याचे इंग्रजी नाव काय?*

*स्पाईडर*

*आंध्र प्रदेश या राज्याचे विभाजन होऊन तयार झालेले राज्य कोणते?*

*तेलंगणा*

 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*बोधकथा *

*शिकारी आणि कबुतर*  

 *एका गावात एक दुष्ट शिकारी राहत होता. तो दररोज जंगलात जावून पशु पक्षांची शिकार करत असे. एकेदिवशी त्याचा जाळ्यात एक कबुतर मादी अडकली, तो तिला मारून खाऊ इच्छित होता. परंतु अचानक पाऊस सुरु झाला. पावसापासून बचाव करण्यासाठी तो एका झाडाखाली थांबला. संयोगाने त्याच झाडाला असलेल्या बिळात हे कबुतर राहत होते. ज्या कबुतर मादीला पकडले होते तिचा पती पत्नीच्या वियोगाने  दु:खी होता. कबुतर मादीने आपल्या पतीला दुखात असलेले पाहिले, ती भावनावश झाली ती कबुतराला म्हणाली,” मला या शिकाऱ्याने पकडले आहे, परंतु या वेळी तो आपला अतिथी आहे. तू माझी चिंता सोडून शिकाऱ्याकडे लक्ष दे. शिकारी थंडीत कुडकुडत आहे.” कबुतराने झाडाची सुकलेली पाने आणि बारीक फांद्या एकत्र करून शिकाऱ्याजवळ शेकोटी पेटवली. त्यामुळे त्याला ऊब मिळाली, शिकाऱ्याला श्रमामुळे भूकही लागली होती. कबुतरान शिकाऱ्याची भूक भागविण्यासाठी त्या आगीत उडी घेतली. कबुतर मादी आपल्या पतीच्या मृत्यूने दु:खी झाली. हे सर्व पाहून शिकाऱ्याच्या मनात अपराधीपणाची भावना वाढीस लागली. ज्या पक्षांना तो मारून खात होता त्यापैकी एकाने त्याच्यासाठी आपला जीव अग्नीच्या स्वाधीन केला होता व शिकाऱ्यावर उपकार केले होते. हे उपकार फेडण्यासाठी त्याने कबुतर मादीला मुक्त केले. पण कबुतर मादीने पतीच्या आठवणीने व्याकूळ होवून आगीत उडी घेतली.* *शिकाऱ्याजवळ पश्चाताप करण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. त्याच्या मूर्खपणाने दोन जीवांचा संसार उध्वस्त झाला होता.*

*तात्पर्य – माणसाची सुस्त चेतना जागृत करण्याची आज गरज आहे. ज्यामुळे निसर्गाचे नुकसान टाळता येवू शकते.*

 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*श्री. देशमुख. एस. बी,**सचिव*नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ**-9011181718* *कार्यवाह – नाशिक जिल्हा T.D.F.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here