पातळेश्वर माध्य. विद्यालयात वृक्षारोपण आणि वृक्ष संस्कार कार्यक्रम संपन्न

0

सिन्नर ; एका मुलाच्या नावाने एक झाड . सोमवार दिनांक:6/8/2024 मु.पो. पाडळी, ता. सिन्नर येथे बाल विज्ञान विकास शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी, पाताळेश्वर विद्यालयाचे  मुख्याध्यापक देशमुख एस. बी.  मराठा विद्या प्रसारक संस्थेतील निवृत्त मुख्याध्यापक खालकर ए.के. सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या समवेत वृक्ष संस्कार आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

याप्रसंगी विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका सविता देशमुख  यांनी कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथींचा परिचय कार्यक्रमाचा उद्देश आज जगाला पर्यावरणाच्या ऱ्हासाच्या संकटातून बाहेर बाहेर पडण्यासाठी लाखो झाडे लावणे आणि ती 100% मोठी करणे, टिकवणे आवश्यक असल्याने विद्यार्थ्यांवर हरित संस्कार करण्यासाठी विद्यालयात आपण विविध कार्यक्रम घेतो त्याचा एक भाग म्हणून कार्यक्रम घेत आहोत. मुख्याध्यापक एस .बी . देशमुख यांनी प्रमुख अतिथींचा सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते खालकर ए.के.यांनी विद्यार्थ्यांना शास्त्रोक्त पद्धतीने वृक्ष  लागवड कशी करावी तसेच वृक्षांचे संगोपन करत असताना घ्यावयाची काळजी वापरावयाची खते औषधे गोष्टी सप्रमाण विशद केल्या. स्थानिक वृक्षाची वृक्षसंपदा आणि नैसर्गिक खते औषधे यांचा वापर कसा करावा याचे सखोल मार्गदर्शन केले.

प्रत्येक वर्षाचा व्यवस्थित आपल्या परिस्थितीनुसार जागेनुसार खड्डा घेऊन त्यामध्येमुठभर शुद्ध राख, मुठभर निंबोळी पेंड, मुठभर बोन पावडर, ऑरगॅनिक खत, टाकून मातीत कालवून घेऊन मऊ मातीवर रोप ठेवून त्याच्याभोवती अजून माती टाकून एखादा पाईप किंवा बॉटल बूड कापून झाकण काढून टाकून उलटी ठेवून बाटलीत  विटेचा  चुरा टाकून मुळ्यांना इजा न होता दाबून दिले नंतर बादलीभर पाण्यामध्ये चिमूटभर मॅग्नेशियम टाकून पाणी ढवळून घेतले आणि ते त्या झाडाला थोड्या प्रमाणात दिले की त्या रोपाच्या मुळ्या व्यवस्थित तग धरतात वृक्षाची हालचाल जास्त झालेली असते त्याला दुखापत इजा झालेली असते ते लवकर मूळ स्थितीवर येते आणि त्याची चांगली वाढ होते हे सर्व सप्रयोग करून दाखवले. रोपांना प्रमाणात व आवश्यक तेवढे पाणी देणे गरजेचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावावर किमान एक तरी झाड असणे आवश्यक आहे. ते त्याने शालेय परिसरात आपल्या शेतात, घराभोवती जिथे सुरक्षित जागा उपलब्ध असेल त्या ठिकाणी लागवड आणि संगोपन करणे आवश्यक आहे. 

 

ज्याप्रमाणे शाळेने रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेले आहे त्याचप्रमाणे सर्वांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग करावे.पाणी आडवावे, पाणी जिरवावे. पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब येथे शक्य होईल तिथे अडवणे गरजेचे आहे. शालेय परिसरामध्ये शेतामध्ये घराभोवती जो पालापाचोळा पडतोच आपण जाळतो ते बंद करून योग्य मापात खड्डा घेऊन त्यामध्ये ती सर्व जमा करून त्यावर जर्मन मेड ऑरगॅनिक कल्चर टाकून त्याच्यातून ब्लॅक गोल्ड काळे सोने म्हणजे खत तयार होते तेच आपण आपल्या झाडांना टाकावे. वरील अनेक सेंद्रिय गोष्टींचा वापर करून आपल्या शेतात जास्तीत जास्त प्रमाणात सेंद्रिय भाजीपाला पिकवावा तो आपण खावा आणि इतरांना खाऊ घालावा त्यातून कॅन्सर सारख्या भयानक आजारांपासून मानवाची मुक्तता होऊ शकेल. मुख्याध्यापक  देशमुख एस .बी .यांनी असे प्रतिपादन केले की आज मुंबई पुणे जगातील सर्व मोठे शहरांमध्ये  ऑक्सिजनचे नळकांडे पाठीवर घेऊन आज फिरण्याचे आणि जगण्याची प्रत्येकावर वेळ आलेली आहे.

प्रत्येक जण अतिशय उच्च तापमानामुळे होरपळून मरण्याची वेळ आलेली आहे, अतिवृष्टीमुळे घर, दारे, शेती जनावरे सर्व काही डोळ्यादेखत नष्ट होत  आहे. यावर उपाय एकच प्रत्येकाने जागृत होऊन लाखो झाडे लागवड करून ही सृष्टी सजवली पाहिजे. पर्यावरणाच्या ऱ्हासाला थांबवले पाहिजे. मानवाचे प्राकृतिक स्वास्थ्य बिघडलेले आहे मनुष्य रोगराईने पोखरला आहे त्यावरती वृक्ष हाच एक रामबाण उपाय आहे असे मत प्रतिपादन केले. सॅटॅलाइट मधून चित्र घेतल्यानंतर भूतलावर कुठेही रिकामी जागा राहणार नाही याची मानवाने काळजी घेतली पाहिजे. या सर्व जाणीव स्वतः आणि सर्व विद्यार्थ्यांमध्ये जिवंत ठेवून  सरांची सातत्याने वाटचाल चालू आहे बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे कोषध्यक्ष टी के रेवगडे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले..विद्यार्थ्यांनी मी हिरवांकुर, मी पर्यावरण योद्धा घोषणा देत कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here