पातळेश्वर विद्यालयात सीमेवरील जवानांना पाठवल्या राख्या …

0

सिन्नर : पाडळी पाताळेश्वर *माध्यमिक विद्यालयात 1995 पासून सुमंत काका गुजराती यांच्या प्रेरणेतून प्रत्येक वर्षी रक्षाबंधनानिमित्त सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी राख्या पाठवल्या जातात व या काळात सुट्टीवर आलेले जवान पाडळी, आशापुर, ठाणगाव, हिवरे, पिंपळे,बोगीरवाडी, ठाकरवाडी येथून जवानांना बोलवून राख्या बांधल्या जातात. चालू वर्षीही परिसरातील सात जवान सुट्टीवर आले असता त्यांना विद्यालयातील* *विद्यार्थिनींनी राख्या बांधून औक्षण केले.

यावेळी मेजर तुकाराम पोटे,  नितीन भगत, ऋषिकेश वारुंगसे, ऋषिकेश रेवगडे, भाऊसाहेब बोगीर , शाहाजी रेवगडे यांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न केला व सीमेवरील लढणाऱ्या जवानांसाठी राख्या पाठवल्या. हा एक आनंदाचा व अविस्मरणीय क्षण आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी या जवानांना जेव्हा राख्या मिळतात तेव्हा त्यांच्याकडून आपल्या बहिणींना पाठवलेले पत्र म्हणजे एक रक्षाबंधनाचे अतूट नाते जोपासल्यासारखे आहे.यावेळी शहाजी रेवगडे यांची नुकतीच एस आर पी एफ मध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.

आपले मनोगत व्यक्त करताना मेजर तुकाराम पोटे म्हणाले की विद्यालयाने राबवलेला उपक्रम अतिशय स्तुत्य असून मला याचा अभिमान आहे. बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. बी. देशमुख म्हणाले की गेल्या 28 वर्षापासून हा उपक्रम शाळेत चालू आहे. याही पुढे तो असाच चालू राहील. आतापर्यंत 225  पेक्षा जास्त विद्यार्थी हे सैन्य दलात सीमेवर काम करतात. त्यांच्यामुळे देश व आपण सुरक्षित आहोत . आपणही या जवानांकडून प्रेरणा घ्यावी असे सांगितले. बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे कोषाध्यक्ष व उपशिक्षक टि.के. रेवगडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. व्ही. निकम यांनी केले. यावेळी बी. आर. चव्हाण, एस. एम. कोटकर, आर. टी. गिरी, एम. एम. शेख, सविता देशमुख, सी. बी. शिंदे, के. डी. गांगुर्डे, एस. डी. पाटोळे, आर. एस.ढोली, ए. बी. थोरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here