सिन्नर :- जागतिक पर्यावरण दिन व शिवराज्याभिषेक दिन सोहळ्या निमित्त पाडळी ता सिन्नर येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात गुरुवार दि ७ जुन रोजी शून्य सर्पदंश जनजागृती अभियान व मानव बिबटया सहजीवन जनजागृतीअभियान कार्यक्रम संपन्न झाला.
नाशिक पश्चिम वनविभागाचे सिन्नर वनपरीक्षेत्र कार्यालय व ए.आर. ई. ए. एस. फॉउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेच्या पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना साप व बिबटया प्राण्याविषयी शास्त्रीय माहिती देण्यात आली.
पावसाळा सुरु होताच परिसरात सर्प दिसण्याचे प्रमाण वाढते व सर्प दंशाच्या घटनेच्या संख्याही मोठया प्रमाणावर घडत असतात यावर खबरदारीचा उपाय म्हणून विद्यार्थ्यांना व शिक्षकांना विविध प्रकारच्या सापांची माहिती व्हावी तसेच सर्पदंश बाबत उपाय* *योजना काय कराव्यात यावर माहिती पर आधारित असलेल्या शून्य सर्प दंश जनजागृती अभियान* *कार्यक्रम घेण्यात आला.
नाशिक पश्चिम वनविभागाचे सहायक वनसंरक्षक ए.जे. पवार – वनपरीक्षेत्र अधिकारी, मनिषा जाधव -वनपरिमंडळ अधिकारी ठाणगाव, एस पी. झोपे – वनरक्षक हिवरे ,जी ए पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ए आर ई ए एस फाउंडेशन संस्थेचे सर्पअभ्यासक व वन्यजीव अभ्यासक सुशांत रणशूर यांनी चार मुख्य विषारी सापांबरोबरच विविध प्रकारच्या सापांची शास्त्रीय माहिती दिली तसेच सर्पदंश होऊ नये किंवा अनावधानाने सर्पदंश झाल्यावर काय प्रथमोपचार करावे तसेच कुत्रा, मांजर, माकड, घोडा, वटवाघूळ या प्राण्यांपासून होणाऱ्या रेबीज आजाराविषयी तसेच मानव बिबटया संघर्ष न करता मानव बिबटया सहजीवनाने कसे जगावे याचे सखोल मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे प्रबोधन केले.
याकामी रणशूर यांच्या सोबत आलेले संस्थेचे सर्पअभ्यासक अमोल सोनवणे चितेगावं,राहुल नाईक नाशिक ,विक्रम कडाळे देवळाली कॅम्प यांनीही उपस्थितांना प्रात्यक्षिक करून दाखवत मदत केली.कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.बी.देशमुख यांनी ए आर ई ए एस फाउंडेशन संस्था राबवत असलेल्या उपक्रमा बाबतीत नागरिकांना व विद्यार्थ्यांना, शिक्षकांना व समाजातील प्रत्येक घटकाला या माहितीची गरज असून असे कार्यक्रम वारंवार आयोजित करण्यात आले पाहिजे असे बोलून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्याविषयी गौरोदगार काढत प्रशंसा केली व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष व विद्यालयाचे उपशिक्षक टी के रेवगडे,बी. आर. चव्हाण, एस .एम. कोटकर, एम एम शेख, सविता देशमुख, सी. बी. शिंदे, के. डी. गांगुर्डे, एस डी. पाटोळे, आर एस. ढोली, ए. बी. थोरे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन आर व्ही. निकम यांनी तर आभार आर टी गिरी यांनी मानले.