सिन्नर : येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयामध्ये १४ सप्टेंबर हा हिंदी दिवस म्हणून साजरा करण्यात आला. १४ सप्टेंबर १९४९ रोजी राष्ट्रसंघाने हिंदीला राजभाषा आणि देवनागरीला राष्ट्रलिपी म्हणून घोषित केले. १४ सप्टेंबर १९४९ पासून भारतामध्ये हिंदी दिवस साजरा करण्यात यावा असे घोषित करण्यात आले. म्हणून १४ सप्टेंबर १९५३ ला पहिला हिंदी दिवस भारतात साजरा करण्यात आला. तेव्हापासून आजपर्यंत हिंदी दिवस पूर्ण भारतात साजरा केला जात आहे.
या निमित्ताने विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन हिंदी भाषेतील कविता, दोहे, कहावते, पहेलिया, हिंदी कहानी, लेखक परिचय अशा विविध हिंदी भाषेतील आपल्या कलागुणांतून अविष्कार दाखविण्याचा प्रयत्न करून हिंदी भाषेचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला . विद्यालयातील उपशिक्षिका सविता देशमुख यांनी मुलांना आपण हिंदी दिवस का साजरा करत आहोत व हिंदी भाषेला महत्त्व का प्राप्त झाले व आपल्या दैनंदिन जीवनात मातृभाषेबरोबर हिंदीचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना आपण आपल्या मातृभाषाबरोबरच इतर भाषांनादुय्यम स्थान न देता त्या अवगत करण्याचा प्रयत्न करावा व आपल्या दैनंदिन जीवनात त्यांचा अधिकाधिक वापर करण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करूया असे सांगितले.
यावेळी सिद्दी पाटोळे ,आराध्या पाटोळे, तनिष्का शिंदे ,ज्ञानेश्वरी बिन्नर, श्रावणी जाधव ,ईश्वरी रेवगडे ,प्रांजली पोटे यांनी कविता सादर केल्या .श्रुतिका रेवगडे, नीतांशू शिंदे,वैष्णवी जाधव, यांनी कहावते सांगितली .शौर्य शेलार, साईराज शिंदे, तनिष्का शिंदे, स्नेहा पाटोळे यांनी नाटिका सादर केली. वैष्णवी शिंदे,अंजली पाटोळे ,पुनम बोगीर ,दर्शन वारुंगसे ,श्रावणी जाधव यांनी हिंदी दिवसाचे महत्त्व सांगितले . श्रावणी जाधव, श्रद्धा सहाने, आरोही शिंदे, वैष्णवीशिंदे ,तनुजा रेवगडे यांनी पहेलिया सांगितली. शुभम जाधव, मयूर पाटील, कार्तिक चव्हाण यांनी चुटकुले सांगितले .अस्मिता वाघ, श्रुती जाधव ,राणी रेवगडे यांनी सुवचने सांगितली . श्याम रेवगडे याने हिंदी गीत सादर केले रुद्र रेवगडे, समर्थ शेलार ,तन्मय रेवगडे यांनी कहानी सांगितली .
यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष व विद्यालयाचे उपशिक्षक टी के रेवगडे ,बी आर चव्हाण, एस एम कोटकर, एम एम शेख ,सविता देशमुख, सी बी शिंदे, के डी गांगुर्डे, एस डी पाटोळे ,आर एस ढोली, आप्पा थोरे उपस्थित होते.