सिन्नर : सिन्नर तालुका ५० वे विज्ञान प्रदर्शन इरा इंटरनँशनल स्कूल,सरदवाडी रोड, सिन्नर येथे ५ आणि ६ जानेवारी २०२३ रोजी संपन्न झाले..यात पाताळेश्वर माध्यमिक विद्यालय पाडळी विद्यालयाच्या प्राथमिक गटातील प्लॅट मॉनिटरिंग सिस्टीम या उपकरणाची प्राथमिक गटात तृतीय क्रमांक मिळवून जिल्हा स्तरावर निवड झाली.
या उपकरणासाठी विद्यार्थी सुजल संजय शिंदे व दर्शन रामकृष्ण वारुंगसे यांनी विज्ञान शिक्षक बी . आर . चव्हाण .आर . टी.गिरी . टी.के. रेवगडे .श्रीमती सी .बी.शिंदे .यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपकरणाची मांडणी करून परीक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची आत्मविश्वासाने उत्तरे देऊन आपल्या उपकरणाची उपयोगिता परीक्षकांना सांगितली. परीक्षकांनी गोंधळात टाकण्यासाठी विचारलेल्या प्रश्नांचे समर्पक उत्तरे देऊन वरील उपकरण शेतकऱ्यांच्या जीवनाची व काळाची गरज ओळखून त्याची शाश्वत जीवनाशी सांगड घालत असल्याचे सांगितले. यातून शेतकरी आपला वेळ व श्रम वाचवून आपल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक शेती करू शकतो व आपल्या पिकास योग्य पद्धतीने पाणी देऊ शकतो. स्वंयचलीत पद्धतीने आपली विद्युत शेती पंप चालू बंद आपल्या भ्रमणध्वनीव्दारे करू शकतो.
या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.बी.देशमुख यांनी आपण विज्ञानाची कास धरून आपल्या जीवनाचा विकास साधू. या असे सांगितले व या मिळालेल्या यशा बद्दल गुणी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
यावेळी बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष राहुलजी सोनवणे,उपाध्यक्ष टी.एस.ढोली,सहसचिव अरुण भाऊ* *गरगटे,कोषाध्यक्ष टी.के.रेवगडे यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले. यावेळी विद्यालयातील शिक्षक बी.आर.चव्हाण,आर.व्ही. निकम, एस.एम.कोटकर, आर.टी.गिरी,एम.सी.शिंगोटे, एम.एम.शेख,सविता देशमुख, टी.के.रेवगडे, सी.बी.शिंदे, के.डी.गांगुर्डे. एस.डी.पाटोळे, आर.एस.ढोली, ए.बी.थोरे उपस्थित होते.