सिन्नर :पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या Pataleshwar high school ४ विद्यार्थ्यांची टेनिक्वाईट या स्पर्धेत दोंडाईचा येथे झालेल्या विभागीय स्पर्धेतून राज्य स्तरावर निवड झाली.
१४ वर्षाआतील मुलांच्या गटात शाम प्रल्हाद रेवगडे, नितांशू गणेश शिंदे तर १७ वर्षा आतील मुलांच्या गटात शिवम गोपाल रेवगडे व १९ वर्षाआतील मुलांच्या गटात सुजल संजय शिंदे यांची दिनांक ९।११।२०२३ रोजी मिरज येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. या सर्व विद्यार्थ्यांना बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. बी. देशमुख व क्रीडा शिक्षिका श्रीमती शेख एम. एम यांचे मार्गदर्शन मिळाले.
यावेळी बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे ‘ मुख्याध्यापक एस.बी.देशमुख यांनी विद्यार्थांना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.कोषाध्यक्ष. टी.के. रेवगडे, बी.आर. चव्हाण, आर. व्ही. निकम, एस. एम. कोटकर,आर. टी. गिरी , एम. सी. शिंगोटे, सविता देशमुख,सी. बी. शिंदे, के. डी. गांगुर्डे, एस. डी. पाटोळे, आर. एस.ढोली, ए. बी. थोरे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.