पाताळेश्वर विद्यालयाच्या १० विद्यार्थ्यांची योगासन स्पर्धेत जिल्हास्तरावर निवड

0

सिन्नर : नुकतेच नवजीवन डे स्कूल सिन्नर येथे दि. ७। ८। २४ रोजी शालेय योगासन स्पर्धा संपन्न झाल्या. यात  तालुक्यातील २० शाळा सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन एस. बी. देशमुख मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष, केंद्रप्रमुख विजय खैरणार, प्राचार्य बी. बी.पाटील , वृषाली लोंढे , किरण मिठे , जे. जे. शिंदे , सिन्नर महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक संजय खैरनार  यांच्या उपस्थितीत योगासन स्पर्धेचे उद्घाटन झाले.

यात पातळेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या १४ वर्षा आतील मुलांच्या गटात श्याम रेवगडे याने प्रथम क्रमांक मिळविला. तर १७ वर्षाआतील मुलांच्या गटात दर्शन वारुंगसे, नितांशु शिंदे यांनी प्रथम क्रमांकाने विजय मिळविला. तर १९ वर्षाआतील मुलींच्या गटात वैष्णवी पाटोळे, प्रतीक्षा पाटोळे , हर्षदा पालवे, तनुजा रेवगडे, प्रगती शिंदे, तेजस्विनी जाधव, अक्सा मनियार या विद्यार्थिनींची प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरावर निवड झाली. त्यांना बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. बी. देशमुख व क्रीडा शिक्षिका श्रीम. शेख एम.एम . यांचे मार्गदर्शन मिळाले.

या वेळी बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे कोषाध्यक्ष टी. के. रेवगडे, बी. आर. चव्हाण, आर. व्ही. निकम, एस. एम. कोटकर, आर. टी. गिरी, सविता देशमुख, सी. बी. शिंदे, के. डी. गांगुर्डे, एस. डी. पाटोळे, आर. एस. ढोली, ए. बी. थोरे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here