पाताळेश्वर विद्यालयात जागतिक पर्यावरण दिन साजरा

0

वृक्ष संगोपन ही काळाची गरज_

 सिन्नर : पाडळी पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या आवारात,परिसरात जागतिक पर्यावरणाचे औचित्य साधून वृक्ष लागवड केली बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.बी.देशमुख यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देतांना ते म्हणाले पर्यावरणाचे रक्षण करणे हे आपले पहिले कर्तव्य असून पर्यावरणातील सर्व घटक मानवासाठी उपयुक्त आहे. वनस्पती, पाणी,जमीन,हवा,यांचा उपयोग मानव आपल्या जीवनात करत असतो व आपल्या गरजा पूर्ण करतो आज पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे व आपणच पर्यावरणाचे संतुलन ढासाळण्यास  कारणीभूत ठरत आहोत. 

 प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या सभोवताली असणाऱ्या पर्यावरणातील सर्व घटकांचे रक्षण करणे, संवर्धन करणे हि आपली जबाबदारी आहे.प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक झाड एक जीवन हि संकल्पना राबवावी वृक्ष संगोपन व जतन करणे ही काळाची गरज आहे हे सांगितले. तसेच बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे कोषाध्यक्ष व विद्यालयाचे शिक्षक टी.के.रेवगडे,बी.आर.चव्हाण, आर.व्ही.निकम,एस.एम.कोटकर,आर.टी.गिरी,एम.एम.शेख,सविता देशमुख,सी.बी.शिंदे,के.डी.गांगुर्डे,एस.डी.पाटोळे,आर.एस.ढोली,ए.बी. थोरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here