पाताळेश्वर विद्यालयात पाडळी गावच्या भाची सुजाता जाधवचा सत्कार

0

ध्येयाचा पाठलाग करत सुजाता जाधवने गाठले उच्च शिखर 

 सिन्नर प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील सोनांबे गावातील लिलाबाई व तानाजी निवृत्ती जाधव. या एका शेतकऱ्याच्या कुटुंबातील कन्या सुजाता तानाजी जाधव यूपीएससी सारख्या परीक्षेमध्ये देशातून २२ वी तर महाराष्ट्रातून पहिली येऊन तिने आपल्या गावाचे, तालुक्याचे, जिल्ह्याचे नाव देशामध्ये पोहचवले. सुजाताचे माध्यमिक शिक्षण हे जनता विद्यालय सोनांबे या ठिकाणी झाले. त्यावेळी दहावीला ती डुबेर केंद्रामध्ये प्रथम आली होती. नंतर पुढील शिक्षण जी.एम.डी.आर्ट्स बी.डब्लू कॉमर्स व सायन्स कॉलेज सिन्नर या ठिकाणी होऊन ती बारावी सायन्स मध्ये प्रथम आली. घरची परिस्थिती अतिशय गरिबीची होती पण तिला पुढील शिक्षणासाठी पुण्यामध्ये शिकायला जायचं होतं तर तिला देशातल्या उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती दिली जाते ती शासकीय शिष्यवृत्ती मिळाल्याने तिची पुढे पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षणासाठी निवड झाली. तिने M.SC. (Statistics, SET). पदवी मिळविल्यानंतर आपल्या बाह्य स्पर्धात्मक परीक्षांचा प्रवास सुरु केला व तिने यूपीएससीचा अभ्यास सुरू केला.आणि आज अतिशय खडतर प्रवासातून तिने तिचे यश संपादन केले.या तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक करून मानसन्मान प्राप्त केला. 

 बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.बी.देशमुख यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणा व विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक परिक्षांविषयी जागृती निर्माण व्हावी यासाठी तिचा सत्कार आयोजित करून तिच्या खडतर प्रवास विद्यार्थ्यांनी अंगी बाळगून मोठे व्हावे. 

 बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष टी.एस.ढोली यांनी सुजाता जाधव हिचा सत्कार करताना खरे सोने ग्रामीण भागातच लपलेले असते.यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून आपली प्रगती उच्च शिखरावर पोहचवावी व आपल्या गावाबरोबर देशाचे नाव सुजाता प्रमाणे उज्वल करावे असे सांगितले. बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे कोषाध्यक्ष व विद्यालयाचे उपशिक्षक टी.के.रेवगडे यांनी मनोगत व्यक्त करतांनी मुलांनी आपल्या प्रतिकूल परिस्थितीची जाणीव ठेवून यशाला सामोरे जा.असे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आर.व्ही.निकम यांनी केले व आभार सौ सविता देशमुख यांनी मानले. 

 

या सत्कार समारंभासाठी सुजाता जाधवचे वडील तानाजी निवृत्ती जाधव,आई लिलाबाई तानाजी जाधव व भाऊ गौरव तानाजी जाधव,शालेय समितीचे चेअरमन चंद्रभान रेवगडे,माजी सरपंच भगीरथ रेवगडे,निवृत्ती महादू शिंदे,वामन कचरू रेवगडे,तुळशीराम शिंदे,शिवाजी रेवगडे,धनंजय रेवगडे,विष्णू रेवगडे व विद्यालयातील उपशिक्षक बी.आर.चव्हाण, आर.व्ही.निकम,एस.एम. कोटकर,आर.टी.गिरी,एम. एम.शेख, सविता देशमुख,सी.बी.शिंदे,के.डी.गांगुर्डे,एस.डी.पाटोळे,आर.एस. ढोली,ए.बी.थोरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here